इटली Rocks, चीन Shocks... मोदींना 'फ्रेण्ड' म्हणणाऱ्या जॉर्जिया मेलोनींचा मोठा निर्णय

Italy Big Shock To China After PM Meloni Meet Modi: डिसेंबर महिन्यातील पहिल्याच दिवशी इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच सेल्फी पोस्ट केला होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 9, 2023, 12:33 PM IST
इटली Rocks, चीन Shocks... मोदींना 'फ्रेण्ड' म्हणणाऱ्या जॉर्जिया मेलोनींचा मोठा निर्णय title=
इटलीने जाहीर केला महत्त्वाचा निर्णय

Italy Big Shock To China After PM Meloni Meet Modi: चीनच्या सर्वात महत्त्वाच्या प्रोजेक्ट बेल्ड अ‍ॅण्ड रोड बीआरआयमधून इटलीने माघार घेतली आहे. यासंदर्भात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारतामध्ये पार पडलेल्या जी-20 शिखर संमेलनामध्ये प्रत्यक्षात भेटून चिनी पंतप्रधान ली कियांग यांना ही माहिती दिली होती. इटलीने या महत्त्वाच्या प्रकल्पामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यामागील कारणही मेलोनी यांनी सांगितलं होतं. या प्रकल्पासंदर्भात करण्यात आलेला करार आमच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे असं इटलीने म्हटलं आहेत. इटलीने आता अधिकृतपणे या प्रकल्पामधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. इटली आता भारताबरोबरचे व्यापारी संबंध अधिक सुदृढ करण्याच्या दिशेने पावलं टाकत आहे. इटली आणि भारतामध्ये जी-20 परिषदेदरम्यान महत्त्वाच्या करारांवर द्विपक्षीय सहमीबरोबरच स्वाक्षऱ्याही झाल्या आहेत.

4 वर्षांपूर्वी चीनबरोबर केलेला करार

इटलीमधील एका वृत्तपत्राच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तामध्ये इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने यासंदर्भात चिनी सरकारला आपली भूमिका कळवली आहे. या वृत्तपत्रानुसार, 3 दिवसांपूर्वी चीनला इटलीने बीआरआय सोडत असल्याची माहिती दिली आहे. इटली 4 वर्षांपूर्वी बीआरआयमध्ये सहभागी झाला होता. 23 मार्च 2019 रोजी तत्कालीन इटालियन पंतप्रधान ग्यूसेप कोंटे यांनी चीनी राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर केलेल्या करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या. चीनला सहकार्य करणारा इटली हा एकमेव देश ठरला होता. 

का घेतली माघार?

बीआरआय प्रकल्पासंदर्भात इटली आणि चीनमध्ये पडद्यामागे मागील अनेक आठवड्यांपासून बैठकींचं सत्र सुरु होतं. मात्र त्याचा कोणताही फायदा झालेला नाही. परराष्ट्र मंत्री एंटोनियो ताजानी यांनी चीनबरोबरच्या या करारामध्ये इटली 4 वर्षांपूर्वी सहभागी झाला होता. मात्र यानंतर दोन्ही देशांमध्ये अपेक्षेप्रमाणे व्यापार वाढलेला नाही. इटली या प्रकल्पामधून बाहेर पडणं हा चीन आणि शी जिनपिंग यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. इटलीने सहकार्य काढून घेतल्याने चीनला त्यांचा हा बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनीशिएटीव्ह (बीआरआय) प्रकल्प पूर्ण करणं अशक्य आहे.

भारताबरोबर करार

विशेष म्हणजे एकीकडे इटलीने चीनबरोबरचा प्रकल्प सोडला असला तरी दुसरीकडे त्यांनी भारताबरोबरचे संबंध अधिक सुदृढ करण्यावर भर दिला आहे. दुबईमध्ये पंतप्रधान मोदींबरोबर इटालियन पंतप्रधान मेलोनी यांनी क्लिक केलेला सेल्फी, त्याला दिलेली कॅप्शन चांगलीच चर्चेत होती.

नवी दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या जी-20 शिखर संमेलनामध्ये भारत, अमेरिका, इटली, सौदी अरेबिया, फ्रान्स, जर्मनी आणि युरोपीय महासंघाने एकत्र येत आयएमईसी प्रकल्पावर सहमती दर्शवत करार केला आहे. हा नवीन प्रोजेक्ट चीनच्या बीआरआयला दिलेलं उत्तर मानला जात आहे. या प्रोजेक्टमुळे भारत, पश्चिम आशिया आणि यूरोपीयन देश एकमेकांशी व्यापारी संबंधांने अधिक घट्टपणे जोडले जाऊन व्यापार अधिक सुखकर होणार आहे.