खुणांची भाषा समजणाऱ्या मादी गोरिलाचा मृत्यू

कोकोच्या मृत्यूनंतर प्राणी प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होतेय.

Updated: Jun 22, 2018, 02:08 PM IST
खुणांची भाषा समजणाऱ्या मादी गोरिलाचा मृत्यू title=
संग्रहित छायाचित्र

कॅलिफोर्निया : खुणांची भाषा समजणाऱ्या जगातल्या एकमेव मादी गोरिलाचा गुरुवारी मृत्यू झाला. कोको या ४६ वर्षीय मादी गोरिलानं बुधवारी रात्री अमेरिकेतील कॅलिफोर्नियातल्या सांताक्रुझ डोंगरावरील अभरयारण्यात अखेरचा श्वास घेतला. कोकला सुमारे १ हजार खुणा अवगत होत्या. या खुणांच्या आधारे तिच्याशी अनेक जण संवाद साधत. खुणांची भाषा समजणारी ही मादी गोरिला जगभरातील प्राणी प्रेमींच्या आकर्षणाचं केंद्र होती. 

१९७४ साली कोको झाली जगप्रसिद्ध

डॉक्टर फ्रॅक्सिन पॅटरसन यांनी १९७४ साली कोकोला खुणांची भाषा शिकवायला सुरुवात केली. नॅशनल जिओग्राफिकनं प्रथम कोकचं दर्शन जगाला घडवलं, आणि ती जगप्रसिद्ध झाली. कोकोनं स्वतःला आरशात न्याहळतानाचं छायाचित्र त्यावेळी नॅशनल जिओग्राफिक्सच्या मासिकाच्या कव्हर पेजवर छापण्यात आलं होतं.

प्राणी प्रेमींमध्ये हळहळ 

कोकोच्या मृत्यूनंतर प्राणी प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होतेय. कोकला सुमारे १ हजार खुणा अवगत होत्या. या खुणांच्या आधारे तिच्याशी अनेक जण संवाद साधत. खुणांची भाषा समजणारी ही मादी गोरिला जगभरातील प्राणी प्रेमींच्या आकर्षणाचं केंद्र होती.