मुंबईकरांनो सावधान ! मुंबई बुडतेय...

नासाच्या एका रिपोर्टनुसार मुंबई आणि कर्नाटकातील मंगरुळ या दोन शहरांना बुडण्याचा धोका आहे. हिमनग आणि जमिनीवरचं बर्फ मोठया प्रमाणात वितळत असल्यामुळे हा धोका निर्माण झाला आहे.

Updated: Nov 17, 2017, 10:54 PM IST
मुंबईकरांनो सावधान !  मुंबई बुडतेय... title=

नवी दिल्ली : नासाच्या एका रिपोर्टनुसार मुंबई आणि कर्नाटकातील मंगरुळ या दोन शहरांना बुडण्याचा धोका आहे. हिमनग आणि जमिनीवरचं बर्फ मोठया प्रमाणात वितळत असल्यामुळे हा धोका निर्माण झाला आहे.

सायन्स मासिकातील निष्कर्ष

जगप्रसिद्ध 'सायन्स' या मासिकात हा निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जगभरातील धोका असलेल्या शहरांची यादी यात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात मुंबई आणि कर्नाटकातील मंगरुळ या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबईच्या समुद्र पातळीत वाढ

नासाच्या एका रिपोर्टनुसार पुढील १०० वर्षांत मुंबईच्या समुद्र पातळीत १५.२६ से.मी. आणि मंगरुळच्या समुद्र पातळीत १५.९८ से.मी.ने वाढ होणार आहे. नासाने विकसित केलेल्या आधुनिक टेक्ऩॉलॉजीमुळे हे शक्य झालं आहे.

जगभरातील हवामान बदलाचा हा परिणाम आहे. आपण वेळीच याची दखल घेतली पाहीजे.