पाकिस्तानात विमान कोसळलं; ९८ प्रवासी दगावल्याची भीती

निवासी भागात विमान कोसळल्याने मोठी खळबळ माजली आहे.

Updated: May 22, 2020, 05:48 PM IST
पाकिस्तानात विमान कोसळलं; ९८ प्रवासी दगावल्याची भीती title=

इस्लामाबाद : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या एक प्रवासी विमानाला शुक्रवारी जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ अपघात झाला. हे विमान लाहोरहून कराची येथे जात होतं.  विमान अपघातात 98 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. लँडिंग होण्यापूर्वीच विमानाला कराची विमानतळाजवळ अपघात झाला. विमान मॉडेल टाऊन या निवासी भागात कोसळल्याने मोठी खळबळ माजली. या निवासी भागातील अनेक घरांना आग लागली आहे. या दुर्घटनेत 7 घरं पूर्णपणे जळून खाक झाली असल्याची प्राथमिक माहिती आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून मदत व बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या विमान अपघाताबाबत दुःख व्यक्त केलं आहे.

विमानात 100 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. विमान अपघातानंतर चारही बाजूंनी दूरपर्यंत धूराचे लोळ पसरले आहेत. अनेक गाड्यांना आग लागली आहे. या अपघातामुळे जिवित आणि वित्त हानीदेखील मोठ्या प्रमाणात झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घरांमधून अनेक रहिवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. कराची येथील रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.