पाकिस्तान टीएलपी नेत्याचा संशयास्पद मृत्यू, अंतयात्रेत लोटला जनसागर

पाकिस्तानातील (Pakistan) टीएलपी नेते खादिम हुसैन रिझवी (TLP Chief Khadim Hussain Rizvi ) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होत आहे.  

Updated: Nov 21, 2020, 07:02 PM IST
पाकिस्तान टीएलपी नेत्याचा संशयास्पद मृत्यू, अंतयात्रेत लोटला जनसागर  title=

लाहोर : पाकिस्तानातील (Pakistan) टीएलपी नेते खादिम हुसैन रिझवी (TLP Chief Khadim Hussain Rizvi ) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होत आहे. लाहोरमध्ये (Lahore) रिझवींच्या अंतयात्रेला जनसागर लोटल्याचे चित्र दिसून आले. या अंतयात्रेमुळे पाकिस्तानाच एकच चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, संशयास्पद मृत्यूमुळे अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत.

खदिम हुसैन यांनी गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना जेरिस आणलं होते. त्यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर चर्चांना उधाण आले. खदिम हुसैन यांनी तहरिक ए लब्बक संघटनेची स्थापना केली. 

२०१८ साली पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इशनिंदा कायद्यात दोषी ठरलेली ख्रिश्चन महिला आसिया बीबीची सुटका केलेली. त्यानंतर रिझवी यांच्या टीएलपीने पाकिस्तानमध्ये गोंधळ माजवला. त्यावेळी रावळपिंडी आणि इस्लामाबादला घेरलेले. लाखो लोक घरातच कैद झालेले. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य आणि इम्रान खान यांच्यावर दबाव वाढलेला होता. याला पाकिस्तानातल्या खदिम हुसैन रिझवी यांच्या अंत्ययात्रेत मोठा जनसागर लोटला. यातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला आहे.

सैन्याच्या हस्तक्षेपानंतरच हा वाद सुटला होता. यानंतर पाकिस्तानच्या कायदा मंत्र्य़ाना राजीनामा द्यावा लागला होता. पण आता खदिम हुसैन रिझवी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर आयसिसने त्यांची हत्या केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही गर्दी पाहता इम्रान यांच्यावर प्रचंड दबाव वाढणार यात शंकाच नाही.