'आम्ही नेहमी मैत्रीचा प्रयत्न केला पण पाकिस्तानने धोकाच दिला'

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. 

Updated: Sep 25, 2019, 07:50 AM IST
'आम्ही नेहमी मैत्रीचा प्रयत्न केला पण पाकिस्तानने धोकाच दिला' title=

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. या द्वीपक्षीय चर्चेमध्ये दहशतवादावर देखील चर्चा झाली. सीमेवरील दहशतवादाचा मुद्दा समोर आणि पाकस्तानने प्रत्येकवेळी धोका दिल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले. 

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेबद्दल माहीती दिली. 'आम्ही चर्चेपासून पळत नाही आहोत. पण पाकिस्तानने प्रथम दहशतवादावर ठोस कारवाई करावी. आम्ही नेहमी मैत्रीचा प्रयत्न केला पण त्यांनी केवळ धोकाच दिला. मी लाहोरला गेलो तर पठाणकोटवर हल्ला केला. या दहशतवादामुळेचे भारताला 42 प्राण गमवावे लागले आहेत. पाकिस्तानने दहशतवादावर लगाम लावावा. तरच चर्चा शक्य आहे.' दहशतवादावर कारवाई करायची की नाही ? हे पाकिस्तानने ठरवावे. नेमकी काय कारवाई करायची हे त्यांना माहीत असल्याचेही ते म्हणाले. 

भारत आणि अमेरिकेत झालेल्या 4.25 लाख कोटी व्यापारिक करारावर देखील त्यांनी भाष्य केले. यासाठी लागणाऱ्या कालावधीवर आम्ही चर्चा केली नाही. पण लवकरच यावर कार्यवाही होईल असेही ते म्हणाले.

'हाऊडी मोदी' मेगा शो

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातल्या ह्युस्टन शहरात 'हाऊडी मोदी' हा मेगा शो पार पडला. यावेळी एनआरजी (NRG) स्टेडिअममध्ये कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी जवळपास ५० हजार लोकांनी उपस्थिती लावली होती. काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७०चा दहशतवाद्यांकडून चुकीचा वापर करण्यात आला असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केले. अनुच्छेद ३७०चा उल्लेख करत भारतासमोर गेल्या ७० वर्षांपासून मोठे आव्हान होते, ज्याला देशाने काही दिवसांपूर्वीच संपुष्टात आणल्याचे मोदी म्हणाले.

दहशतवादाविरोधात निर्णायक लढाईची वेळ आली असल्याचे वक्तव्य करत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला नाव न घेता इशारा दिला आहे. 

या कार्यक्रमाचे नाव Howdy Modi आहे. परंतु मोदी ऐकटे काही नाही आहेत. मी सव्वा कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणारा साधारण व्यक्ती आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही विचारले #HowdyModi त्याचे उत्तर, भारतात सर्व काही चांगले सुरु आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.