राष्ट्रध्यक्ष पुतिनला निवडणुकीत पॉर्न स्टार देणार टक्कर

निवडणूकीत असणारा गोंधळ तर साऱ्यांनाच माहित आहे. अनेकदा यामध्ये बॉलिवूड कलाकार उतरताना आपण पाहिले आहेत. मात्र 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 22, 2017, 03:56 PM IST
राष्ट्रध्यक्ष पुतिनला निवडणुकीत पॉर्न स्टार देणार टक्कर  title=

रूस : निवडणूकीत असणारा गोंधळ तर साऱ्यांनाच माहित आहे. अनेकदा यामध्ये बॉलिवूड कलाकार उतरताना आपण पाहिले आहेत. मात्र 

जर याच निवडणुकीत कुणी पॉर्न स्टार उतरली तर या निवडणुकीचा रंग काय असेल याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तसेच पॉर्न स्टापच्या समोर असणाऱ्या बाकीच्या नेत्यांची काय अवस्था असेल त्याचा देखील विचार करा.  असंच काहीस आता रूसमध्ये दिसणार आहे. रूसच्या पुढील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हा गोंधळ पाहायला मिळणार आहे. निवडणुकीकडे आता साऱ्यांचच लक्ष लागून राहिलं आहे. 

Elena Berkova

व्लादिमीर पुतिन सध्याच्या राष्ट्रध्यक्षपदावर विराजमान आहे. पुढील निवडणुकीत त्या पुन्हा या शर्यतीत उतरणार आहे. पुतिनला इतर पक्षातील उमेदवारांनी जोरदार टक्कर देण्यासाठी तयारी केली आहे. आता या निवडणुकीत थोडा ग्लॅमर तडका देखील पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत ऐलेना बर्कोवा चौथी उमेदवार म्हणून उभी राहणार आहे. ऐलेना बर्कोवा एक लोकप्रिय मॉडेल असून ती पॉर्न स्टार देखील राहिलेली आहे. तसेच ऐलेनाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून म्हटलं आहे की, निर्माता वेनस्टेनला मी कंटाळली आहे. त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप देखील आहेत. 

Elena Berkova

कोण आहे ऐलेना बर्कोवा ?

मुर्मान्स्क शहरात राहणारी ३२ वर्षीय ऐलेना या अगोदरची निवडणुक लढवून झाली आहे. २००९ मध्ये ऐलेनाने मेअर पदासाठी देखील निवडणूक लढवली आहे. त्यावेळी ती राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी तिचं वय लहान होतं त्यामुळे तीला निवडणूक लढवता आली नाही. राष्ट्राध्यक्ष पदासाठी कमीत कमी वय हे ३५ वर्षांचं असणं गरजेचं असते. बर्कोवाने २००४ मध्ये पॉर्नच्या दुनियेत पाय ठेवले होते. इंस्टाग्रामवर तिचे जवळपास ७ लाख फॉलोअर्स आहेत. 
पॉर्न सिनेमांनंतर ऐलेनाने टीव्ही शो डोम २ मध्ये सहभाग घेतला. त्यानंतर ड्रग्स बाळगल्या प्रकरणी तिला ३ वर्षाची शिक्षा देखील झाली होती. 

Elena Berkova

पॉर्न स्टार ऐलेना बर्कोवाचे काय आहेत आश्वासन 

१) ४० सेंटीमीटरपेक्षा लांब स्कर्ट घालणं अपराध असेल 
२) पुरूषांना घटस्फोट देण्याचा अधिकार नाही, वेगळा नियम तयार करणार 
३) लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला मिळणार कठोर शिक्षा, भररस्त्यात देणार फाशी 
४) सेक्स एज्युकेशन महत्वाचे असणार आणि त्याची परिक्षा पास होणे गरजेचे