वैज्ञानिकांना सापडला हजारो वर्षे जुना दगड; उलगडलं 1,640,000,000 वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचं रहस्य

काही संशोधनं, निरीक्षणं आपल्याला थक्क करून सोडतात. अनेक प्रश्नांना जन्मही देऊन जातात. नुकतंच झालेलं हे संशोधन त्यापैकीच एक. पाहा शास्त्रज्ञांच्या हाती असं नेमकं लागलंय तरी काय...   

सायली पाटील | Updated: Aug 8, 2023, 01:12 PM IST
वैज्ञानिकांना सापडला हजारो वर्षे जुना दगड; उलगडलं 1,640,000,000 वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचं रहस्य title=
(छाया सौजन्य- Australian National University)/ Scientists found billion year old Australian rock know details

World Discovery News : जगाची उत्पत्ती कुठून झाली इथपासून या पृथ्वीवरील सर्वात पहिला सजीव कोण होता इथपर्यंतची अनेक निरीक्षणं, अनेक अभ्यास आतापर्यंत केले गेले. बऱ्याच वैज्ञानिकांनी, संशोधकांनी आणि अभ्यासकांनी त्यांच्या परीनं यासाठी योगदान दिलं. अनेक वर्षांची मेहनत, चिकाटी आणि प्रचंड समर्पणातून तुमच्याआमच्यासमोर जीवसृष्टीचं रहस्य वेळोवेळी उलगडत राहिलं. अशा या जीवसृष्टीसंदर्भातील आणखी एक धागा नुकताच शास्त्रज्ञांच्या हाती लागला आहे. या संशोधनामुळं सध्या अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, जीवसृष्टीच्या सर्वाधिक जुने अवशेष हाती लागल्याला दावा करण्यात येत आहे. 

शास्त्रज्ञांकडून करण्यात येणाऱ्या दाव्यानुसार गतकाळातील संपूर्ण जीवसृष्टीचं रहस्य एका हजारो वर्षांपूर्वीच्या खडकामुळं होत असून, ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागातून हा खडक हाती लागला. ज्यामुळं मानवाच्या उत्क्रांती प्रक्रियेतील त्याच्या पहिल्यावहिल्या पूर्वजांबद्दलच्या माहितीची उकल होऊ शकते. 

1,600,000,000 वर्षांपासूनचं अस्तित्वं

शास्त्रज्ञांच्या मते निरीक्षणादरम्यान समोर आलेल्या सूक्ष्मजीवांना Protosterol Biota असं नाव देण्यात आलं असून, ते eukaryotes गटातील असल्याचं म्हणत साधारण 1,600,000,000 वर्षांपासून त्यांचं पृथ्वीवरील जलस्त्रोतांमध्ये वास्तव्य होतं. आधुनिक काळातील या सूक्ष्म जीवांच्या रुपांबद्दल सांगावं तर, यामध्ये रोपं, प्राणी, एकपेशीय सूक्ष्मजीव (अमीबा) आणि बुरशीचा समावेश होतो. 

हेसुद्धा वाचा : उजव्या हातानं लिहिणारे, की डावखुरे; सर्वाधिक हुशार कोण? 

Benjamin Nettersheim यांच्या मते नव्यानं झालेल्या संशोधनातून समोर आलेले संदर्भ पाहता हे सूक्ष्मजीव पृथ्वीवरील सर्वात जुन्या जीवसृष्टीचा भाग असून, कालगणनाही सुरु झाली नव्हती तेव्हापासन त्यांचं अस्तित्वं असावं. जवळपास 10 वर्षांच्या संशोधनानंतर Protosterol Biota बाबतची सविस्तर माहिती आणि अहवाल जगापुढे आणण्यात आला. हे सूक्ष्मजीव पृथ्वीवरील सर्वाधिक जुने शिकारी असल्याचंही या निरीक्षणातून उघड झालं. 

कसं पार पडलं संशोधन? 

ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेतील संशोधक/ शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडे असणाऱ्या एका महासागरात सापडलेल्या खडकामधील रेणूचा अभ्यास करण्यात आला. ज्यामाध्यमातून ही माहिती समोर आली. मध्ययुगातील अनेक खडक आणि तत्सम अवशेषांच्या साठ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा उत्तर भाग ओळखला जातो. जिथून आणखी एक दुवा शास्त्रज्ञांच्या हाती लागला आहे. 

निरीक्षणादरम्यान आढळलेल्या खडकातील रेणुमध्ये primordial केमिकल स्ट्रक्चर असल्याचं लक्षात आलं. ज्यामुळं जीवसृष्टीच्या अगदी सुरुवातीकडेच निरीक्षणाच्या दिशा वळल्या. आहे की नाही हे डोकं चक्रावणारं संशोधन?