'कृत्रिम सुर्य..10 कोटी डिग्री तापमान'; दक्षिण कोरियाच्या प्रयोगाने दुनिया हैराण

South Korea Artificial sun: सध्या जगभरातील अनेक देश कृत्रिम सुर्यावर काम करत आहेत. यामध्ये चीन, अमेरिका आणि फ्रान्स यांचा समावेश आहे.

Pravin Dabholkar | Updated: Apr 2, 2024, 05:34 PM IST
'कृत्रिम सुर्य..10 कोटी डिग्री तापमान'; दक्षिण कोरियाच्या प्रयोगाने दुनिया हैराण  title=
South Korea Artificial sun

South Korea Artificial sun: जगात देश-प्रदेश जरी कित्येक असले तरी पृथ्वी, सुर्य आणि चंद्र एकच असल्याचे आपण शिकलो असू. पण विज्ञान इतक्या पुढे गेल्यानंतर जगात काय ऐकायला मिळेल सांगता येत नाही.दक्षिण कोरियाच्या परमाणू वैज्ञानिकांनी पृथ्वीवर 10 कोटी डिग्री सेल्लियस तापमान निर्माण करुन वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहे. इतके तापमान आतापर्यंत कोणत्याच देशाने निर्माण केले नाही. कृत्रिम सुर्याच्या परमाणू संलयन प्रयोगातून हे तापमान निर्माण केलेले हे तापमान सुर्याच्या कोरपेक्षा सातपट असल्याचे सांगण्यात येतंय. भविष्यातील औद्योगिक उर्जेच्या दिशेने हा एक मैलाचा दगड सिद्ध होईल, असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.

सध्या जगभरातील अनेक देश कृत्रिम सुर्यावर काम करत आहेत. यामध्ये चीन, अमेरिका आणि फ्रान्स यांचा समावेश आहे.

परमाणू संलयन म्हणजे काय?

परमाणू संलयनला इंग्रजीमध्ये न्यूक्लियर फ्यूजन असे म्हटले जाते. 2 परमाणू एकमेकांशी जोडले जातात तेव्हा हे निर्माण होते. यातून खूप मोठ्या प्रमाणात उर्जा निर्माण होते. जेव्हा परमाणू अत्याधिक गरमी आणि दबावामध्ये असतो तेव्हा संलयन होते.  पृथ्वीवर ही प्रक्रिया प्रत्यक्षात साकारण्यासाठी विशेष चेंबरची गरज असते. 

वैज्ञानिकांना न्यूक्लियर फ्यजून रिएक्टर चालविण्यात यश मिळाल्यानंतर अनेक फायदे होणार आहेत. जिवाश्म इंधन जळल्यानंतर होणाऱ्या संलयन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. पण पृथ्वीवर या प्रक्रियेमध्ये यश मिळवणे हे खूपच आव्हानात्मक आहे. 

कोरियाई इंस्टिट्यूट ऑफ फ्यूजन एनर्जीने काय म्हटलं?

संलयन उर्जा मिळवण्याच्या सर्वसाधारण प्रक्रियेमध्ये टोकामक नावाचे डोनटच्या आकाराचा रिअॅक्टर सहभागी असतो. ज्यामध्ये प्लाझ्मा बनवण्यासाठी हायड्रोजन व्हेरिएंटला असाधारण उच्च तापमानावर गरम केले जाते. उच्च तापमान आणि उच्च घनत्वाचे प्लाझ्मा परमाणू संलयन रिएक्टरांटरच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण आहे. यामध्ये लांब आणि अधिका काळासाठी प्रक्रिया होऊ शकते, अशी माहिती कोरियाई इंस्टिट्यूट ऑफ फ्यूजन एनर्जी (KFE) मध्ये KSTAR रिसर्च सेंटरचे संचालक सी-वू यून यांनी दिली. 

उच्च तापमान प्लाझ्माची अस्थिर प्रकृतीमुळे हे उच्च तापमान कायम ठेवणे सोपे नाहीय. त्यामुळेच हा रेकॉर्ड खूप महत्वपूर्ण असल्याचे ते सांगतात.