कोंबडीवर अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

एक धक्कादायक बातमी. कोंबडीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका मुलाला अटक करण्यात आलेय.

Reuters | Updated: Nov 14, 2017, 06:40 PM IST
कोंबडीवर अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक
संग्रहित छाया

इस्लामाबाद : एक धक्कादायक बातमी. कोंबडीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका मुलाला अटक करण्यात आलेय.

एका १४ वर्षीय मुलाने कोंबडीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. ही घटना पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामधील हफीजाबाद येथे घडलेय.

या घटनेचे वृत्त एका इंग्रजी वृत्तापत्राने दिली आहे. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ नोव्हेंबरला जलालपूर भट्टीजवळ घडली. तसे वृत्त द एक्स्प्रेस ट्रीब्यूनने दिलेय. कोंबडीच्या मालकाने या १४ वर्षीय युवकाविरुद्ध पोलिसात तक्रार केली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

या मुलाने घरातील कोंबडी पळवून नेली आणि कोंबडीवर अत्याचार केल्याचा आरोप कोंबडी मालकाने दिलेल्या तक्रारीत केला आहे.