....म्हणून पत्नीसह प्रिन्स हॅरीचा राजघराण्यापासून दुरावा?

ब्रिटनच्या राजघराण्यातील बऱ्याच गोष्टी कायमच अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरल्या आहेत. पण....

Updated: Jan 13, 2020, 09:25 PM IST
....म्हणून पत्नीसह प्रिन्स हॅरीचा राजघराण्यापासून दुरावा? title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : ब्रिटनच्या राजघराण्यातील बऱ्याच गोष्टी कायमच अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरल्या आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून मात्र हे राजघराणं चर्चेत आहे ते एका मह्त्वाच्या कारणामुळे. हे कारण म्हणजे प्रिन्स हॅरी prince harry  आणि त्याची पत्नी अभिनेत्री मेगन मार्कल meghan markle यांचा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय. राजघराण्यापासून दूर होत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. 

मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या या निर्णयानंतर ब्रिटनच्या राजघराण्यातील अशांतता अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली. काही दिवसांपूर्वीच मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्याकडून आपण राजघराण्यातील वरिष्ठ पदापासून दूर होण्यासंबंधीची माहिती देण्यात आली. 

उत्तर अमेरिका आणि युके या ठिकाणी ते पुढील जीवन व्यतीत करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या मेगन ही आपल्या मुलासह कॅनडामध्ये असून, तेथेच ती धर्मदाय संस्था सुरू करणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

माध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या चर्चा आणि सुत्रांच्या माहितीचा आधार पाहता मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या राजघराण्यापासून दूर जाण्याच्या या निर्णयामागे फक्त आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं हे  एकच कारण नसू शकतं असं म्हटलं जात आहे. प्रिन्स हॅरी आणि त्याच्या मोठ्या भावामध्ये गेल्या वर्षी काही मतभेद झाल्याचं कळत आहे.

VIRAL VIDEO : लग्नसोहळ्यात पाहायला मिळाला 'या' जोडीचा सुरेल अंदाज

प्रिन्स हॅरीचा भाऊ हा राजघराण्याच्या वारसा हक्कांनुसार सिंहासनासाठी दुसऱ्या क्रमांकाचा दावेदार आहे. इतकंच नव्हे, तर ब्रिटनच्या काही वर्तमानपत्रांमध्येही राजघराण्यातील या नाराजीचं वृत्त होतं. मेगन आणि प्रिन्स यांच्या या निर्णयाची मुळात कोणालीह कल्पना नव्हती. परिणामी ब्रिटनच्या राजघराण्याकडून यासंदर्भातील बैठक बोलवण्यात आली, जेथे याविषयीची अधिकृत आणि औपचारिक चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा आता या चर्चांचे आणि बैठकीचे परिणाम काय असणार याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे.