Plane Crash: महिला पायलटच्या बाजूला बसलेल्या मुलानं केलं असं कृत्य, प्लेन झालं क्रॅश

विमानातील बिघाड आणि अपघातांच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. अशीच घटना अमेरिकेतून समोर आली आहे. प्रशिक्षणार्थी मुलाच्या चुकीमुळे विमान कोसळलं. हा सर्व प्रकार महिला पायलट कॉकपिटमध्ये असताना घडला. 

Updated: Oct 10, 2022, 07:29 PM IST
Plane Crash: महिला पायलटच्या बाजूला बसलेल्या मुलानं केलं असं कृत्य, प्लेन झालं क्रॅश title=

Plane Crash in America: विमानातील बिघाड आणि अपघातांच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. अशीच घटना अमेरिकेतून समोर आली आहे. प्रशिक्षणार्थी मुलाच्या चुकीमुळे विमान कोसळलं. हा सर्व प्रकार महिला पायलट कॉकपिटमध्ये असताना घडला. दुर्दैवाने महिला पायलटचा जागीच मृत्यू झाला. तर प्रशिक्षणार्थी विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाला आहे. कॉकपिटमध्ये पायलट आणि दोन प्रशिक्षणार्थी मुले होती. वास्तविक, ही घटना अमेरिकेतील व्हर्जिनियामधील आहे. येथे एक महिला पायलट आणि दोन नवीन प्रशिक्षणार्थी मुले मिनी विमानाच्या कॉकपिटमध्ये होते. ही महिला पायलट देखील फारशी अनुभवी नव्हती आणि तिला नुकताच विमान उडवण्याचा परवाना मिळाला होता. तिला दोन्ही मुलांना विमान कसे उडवायचे ते शिकवायचे होते.

रिपोर्टनुसार, विमानाने उड्डाण करताच पायलटने दोन्ही मुलांना पुढे काय करायचे ते सांगण्यास सुरुवात केली. दरम्यान, एका मुलाने चुकीची पद्धत वापरली. विमान उंच नेण्यासाठी वरच्या दिशेने उंचावलं. विमान 100 फूट उंचीवर गेल्यावरच विमान नियंत्रणाबाहेर गेले.

Hrithik Roshan ला मित्रांसमोरच वडिलांनी धु धु धुतलं, कारण वाचून तुम्हालाही येईल राग

विमान नियंत्रणाबाहेर गेल्याने लगेचच खोऱ्यात पडले. या अपघातात महिला पायलटचा जागीच मृत्यू झाला, तर हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या संबंधित प्राधिकरणाने चौकशीचे आदेश दिले आहेत.