Viral Video: पापा की परी! पेट्रोल पंपवरील महिलेचा 'तो' नक्की पाहाच

Funny video: सध्या सोशल मीडियावर (Social media) एका पापा की परीचा व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. 

Updated: Oct 2, 2022, 01:21 PM IST
 Viral Video: पापा की परी! पेट्रोल पंपवरील महिलेचा 'तो' नक्की पाहाच title=
Trending video woman at petrol pump viral on social media nmp

Viral Video: अनेक वेळा तरुणी असं काही करतात की, त्यांना पापा की परी (Papa Ki Pari) म्हणून हिणवलं जातं. रस्त्यांवरुन गाड्यांची ये-जा सुरु आहे अशात एक तरुणी मस्त मोबाईलवर (Mobile) बोलत रस्ता ओलांडत असते, अशावेळी वाहनचालक तिला पापा की परी म्हणून हाक मारतात. असे अनेक किस्से आपण पाहिले आहेत. 

सध्या सोशल मीडियावर (Social media) एका पापा की परीचा व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. तुम्ही म्हणाल असं काय केलं या तरुणींने...तर पहिले हा व्हिडीओ पाहाच...परदेशात पेट्रोल पंपावर (Petrol pump) लोकांना स्वतःहून गाडीमध्ये पेट्रोल भरावे लागतं. एक तरुणी पेट्रोल पंपवर आपली आलिशान गाडी घेऊन गेली असता, तिला पेट्रोल भरण्यासाठी आलेली समस्या या व्हिडीओमध्ये पाहिला मिळतं आहे. 

मजेदार व्हिडीओ (Funny video)

हा मजेदार व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की आपण हिला पापा की परी का म्हणतं आहोत, ते...हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हालं की ही तरुणी खरंच इतकी मूर्ख आहे का? (Trending video woman at petrol pump viral on social media nmp)

ही तरुणी आपल्या मर्सिडीज कारमध्ये (Mercedes car) इंधन (Fuel) भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचली. तेथे त्याने मशीनपासून काही अंतरावर कार उभी केली आणि त्यानंतर मशीनमधून पाईप काढून गाडीच्या इंधन टाकीजवळ नेण्यास सुरुवात केली. आता गाडी दूर उभी असल्याने पाईप तिथे पोहोचू शकत नव्हता. अशा स्थितीत महिलेने पाईप जमिनीवर ठेवला आणि नंतर कार पलटवून आणली...

काय रे देवा!

या व्हिडीओमध्ये या तरुणीचा इंधन भरण्यासाठीचा संघर्ष पाहून आपल्याला हसू की रडू असं होतं. ती अनेक प्रकारे गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी परिश्रम घेतं असते. पण तिला काही केल्या कार आणि इंधन पाईपचं अंदाज येतं नव्हता. कधी या दिशेने गाडी लाव, तर कधी त्या दिशेने पण काही केल्या या पापा की परीला इंधन भरायला जमत नव्हतं. 

पेट्रोल पंपवरील इतर वाहनचालक तिची ही मजा पाहत होते. अखेर काही वेळानंतर आणि त्या तरुणीच्या अथक प्रयत्नानंतर तिने कारमध्ये इंधन भरलं. 

हा व्हिडीओ Clown World या ट्वीटर (Twitter) अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या मजेदार व्हिडीओला आतापर्यंत 80 लाखांहून अधिक व्ह्यूज (Views) मिळाले आहेत.