ट्रम्प यांच्या पत्नीने असं केलं मोदींचं खास स्वागत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा खास आहे. राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप हे जितके या दौऱ्यामुळे खूश आहेत तितकीच त्यांची पत्नी देखील खूश आहे. अमेरिकेच्या पहिल्या महिला नागरिक मेलानियाने मोदींचं स्वागत एका खास अंदाजात केलं. 

Updated: Jun 27, 2017, 02:09 PM IST
ट्रम्प यांच्या पत्नीने असं केलं मोदींचं खास स्वागत title=

वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा खास आहे. राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप हे जितके या दौऱ्यामुळे खूश आहेत तितकीच त्यांची पत्नी देखील खूश आहे. अमेरिकेच्या पहिल्या महिला नागरिक मेलानियाने मोदींचं स्वागत एका खास अंदाजात केलं. 

मेलानिया यांनी मोदींचं स्वागत करतांनाचा एक फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये मोदी आणि ट्रम्प दोघे एकमेकांना भेटतांना दिसत आहेत. मेलानिया यांनी ट्विट करत म्हटलं की, 'पंतप्रधान मोदी तुमचं व्हाईट हाऊसमध्ये स्वागत आहे.' आतपर्यंत राष्ट्राध्यक्षांचं ट्विट करणं तसं सामान्य होतं पण मोदींचं स्वागत करतांनाचा मेलानिया याचं हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड रिट्विट आणि लाईक होतंय. मेलानिया यांचं हे ट्विट दर पाचव्या सेंकदाला रिट्विट होतं आहे. लाईक करणाऱ्यांची संख्या देखील हजारोंमध्ये आहे.

मेलानिया त्यांच्य़ा ड्रेसमुळे देखील चर्चेत आहेत. मोदींच्या स्वागतासाठी त्यांनी घातलेला ड्रेस हा तब्बल दीड लाखांचा आहे.