Turkey Earthquake : पक्ष्यांना आधीच लागलेली भूकंपाची चाहूल; किलबिलाट नव्हे तो आक्रोश होता; थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

Turkey Earthquake Updates Video : पश्चिम आशियात सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरिया या देशांमध्ये हाहाकार माजला. या महाविध्वंस आघाताचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. 

Updated: Feb 7, 2023, 01:20 PM IST
Turkey Earthquake : पक्ष्यांना आधीच लागलेली भूकंपाची चाहूल; किलबिलाट नव्हे तो आक्रोश होता; थरकाप उडवणारा VIDEO VIRAL title=
turkey earthquake birds felt an earthquake building collapsing trending Video Viral on social media

Viral Video Turkey Earthquake : सीरियाच्या युद्धभूमीत नैसर्गिक आघाताने महाभयानक भूकंपाने एका क्षणात सर्व होत्याचं नव्हतं झालं. आधीच गृहयुद्धामुळे झळा सोसत असलेल्या या देशावर या नैसर्गिक आघातामुळे अख्ख शहर डोळ्यादेखत उद्धवस्त झालं आहे. या भीषण भूकंपानं हजारोंच्या संख्येनं नागरिकांचा मृत्यू आवेशात खेचलं आहे. अतिशय विदारक दृश्यं दाखविणारे भूकंपाची अंगावर काटा आणणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. (turkey earthquake birds felt an earthquake building collapsing trending Video Viral on social media)

तुर्कस्तानच्या हाताय विमानतळाची एकमेव धावपट्टीही या भूकंपामुळे संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली. आता या विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत. हा व्हिडीओ पाहून भूकंपाची तीव्रता तुम्हालाही जाणवली असेल. 

 या देशातील प्रमुख शहरांमधील गंगनचुंबी इमारती पत्तासारखा कोसळल्यात. डझनभर इमारती क्षणात धुळीस मिळाल्यात. 

 तुर्कीमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात शेकडो लोकांचा बळी गेला आहे तर हजारोंनी नागरिक जखमी झाली आहेत. 

या भूकंपामुळे इमारती जमीनदोस्त झाल्या. एका इमारतीच्या ढिगाऱ्या खालून लहान मुलाला सुखरुप बाहेर काढताना दिसतं आहे. अद्याप अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

 पहाटेच्या भूकंपाच्या वेळी अनेक लोक गाढ झोपले होते. त्यामुळे नक्की काय घडलं हे दाखवणारा हा व्हायरल व्हिडीओ आहे. 

 असं म्हणतात नैसर्गिक आपत्तीची प्राण्यांना चाहुल लागेत. असाच एक भूकंपाचा व्हायरल व्हिडीओमध्ये पक्षी आकाशात गोंधळून आवाज काढताना दिसत आहेत. एका दृश्यात ते झाडावर कळपात बसलेलेही दिसत आहेत. तुर्कस्तानमध्ये पहाटे 4.17 वाजता भूकंप झाला, बहुधा त्यावेळी कोणीतरी जागं झालं असावं आणि त्यांनी पक्ष्यांच्या हा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला.

हे व्हायरल व्हिडीओ पाहून खरंच मन सुन्न होतं. आता या देशाला उभारण्यासाठी बळ मिळावं.