Twitter: 'श्रीराम' ठरवणार ट्विटरची दिशा; पाहा Elon Musk यांच्या निर्णयांमागे कोणाची चाणाक्ष बुद्धी?

Elon Musk Twitter  : एलॉन मस्क यांच्या हाती ट्विटरची सूत्र जाताच त्यांनी तातडीनं काही महत्त्वाच्या बदलांकडे लक्ष देण्यात सुरुवात केली. पण, त्यांचे हे निर्णय नेमके कोण घेत होतं? खुद्द मस्क? असं म्हणतात की त्यांच्या या निर्णयांमागे एका व्यक्तीचा हात आहे. कोण आहे ती व्यक्ती?   

Updated: Nov 1, 2022, 06:53 AM IST
Twitter: 'श्रीराम' ठरवणार ट्विटरची दिशा; पाहा Elon Musk यांच्या निर्णयांमागे कोणाची चाणाक्ष बुद्धी?  title=
Twitter might get another indian ceo Elon Musk Twitter Acquisition

Elon Musk Twitter Acquisition: ट्विटरची मालकी मिळताच एलॉन मस्क (Elon Musk) यांनी कंपनी आणि एकंदर कार्यकारिणीमध्ये काही बदल करण्यास सुरुवात केली. भारतीय वंशाचे CEO पराग अग्रवाल (Parag Agarwal) यांच्यासह काही अधिकाऱ्यांना मस्क यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. तिथे एका भारतीयानं ट्विटरमधून (Twitter) एक्झिट घेतलेली असतानाच मस्क आता त्यांचे निर्णय नेमके कोणत्या धर्तीवर घेणार याचीच चर्चा सुरु झाली. सोशल मीडियामध्ये एक Intellectual माध्य़म म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ट्विटरची पुढची रणनिती कोण आखणार असेच प्रश्नही उपस्थित झाले. यावर उत्तर मिळालं, 'श्रीराम'. 

ट्विटरच्या CEO पदावर पुन्हा एकदा एका भारतीय वंशाच्या व्यक्तींचीच नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच अशीही चर्चा रंगतेय, की श्रीराम कृष्णन (Sriram Krishnan) यांना ही जबाबदारी मिळू शकते. इतकंच काय, तर असंही म्हटलं जात आहे की हल्लीच्या दिवसांमध्ये ट्विटरमध्ये जे काही बदल केले जात आहेत त्यामागे श्रीराम यांच्याच चाणाक्ष बुद्धीचा हात आहे. (Twitter might get another indian ceo after Elon Musk  Acquisition)

अधिक वाचा : ट्विटरवर ब्लू टिकसाठी आता द्यावे लागणार पैसे?; Elon Musk यांच्या ट्विटने एकच चर्चा

 

खुद्द कृष्णन यांनीच सोमवारी ट्विटरच्या माध्यमातून एक ट्विट करत आपण मस्क यांच्या या कामात मदत करत असल्याचा दावा केला. आपण तात्पुरती मदत करत असल्याचं ते या ट्विटच्या माध्यमातून म्हणाले. इथे रंजक गोष्ट अशी की, श्रीराम हे एकेकाळी ट्विटरचे कर्मचारीसुद्धा होते. 

कोण आहेत श्रीराम कृष्णन? 

श्रीराम (A16z) म्हणजेच Andreessen Horowitz कंपनीमध्ये जनरल मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे बिट्स्की, होपिन आणि पॉलीवर्कच्या कार्यकारिणीमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. त्यांच्याकडे स्नॅप (Snap) आणि फेसबुक (Facebook) च्या मोबाईल जाहिरात प्रोडक्ट विभागाचीही जबाबदारी आहे. ट्विटरमध्ये त्यांनी वरिष्ठ संचालक, अर्थात सिनियर डायरेक्टर पदीही काम केलं होतं. 

Twitter:'श्रीराम' के सहारे ट्विटर चलाएंगे एलन मस्क! कौन है उनके फैसलों के पीछे?

भारताशी खास नातं... 

कृष्णन यांनी चेन्नईमध्ये 2001 ते 2005 मध्ये अन्ना युनिव्हर्सिटीतून एसआरएम इंजीनियरिंग कॉलेजमधून IT क्षेत्रातील पदवी शिक्षण घेतलं. 2007 मध्ये ते मायक्रोसॉफ्टमध्ये व्हिज्युअल स्टुडिओचे प्रोग्राम मॅनेजर होते. आरती रामामूर्ती यांच्याशी विवाहबंधनात अडकणारे कृष्णन सॅनफ्रान्सिस्को येथे राहतात.