Video : बागेत कुत्र्यासोबत खेळत होता चिमुकला, काठी समजून साप पकडला आणि...

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Updated: Jun 3, 2022, 01:03 PM IST
Video : बागेत कुत्र्यासोबत खेळत होता चिमुकला, काठी समजून साप पकडला आणि... title=

मुंबई : मुलांना घरातील बागेत खेळायला फार आवडते. फॉरेनमध्ये अनेकदा लहान मुलं आपल्या पाळीव प्राण्यांसोबत बागेत मजा करताना दिसतात. मात्र कधीकधी मुलांना बागेत खेळणं महागातंही पडू शकतं याची तुम्हाला कल्पना आहे. नुकतीच प्रचिती आली ती सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या या व्हिडीयोमध्ये एक चिमुकला आपल्या घराच्या बागेत कुत्र्यासोबत खेळताना दिसतोय. मुलाच्या हातात एक लाकूड दिसतंय. हा चिमुकला प्रथम लाकूड फेकतो आणि नंतर कुत्रा ते लाकूड उचलतो आणि मुलापर्यंत आणतो. हे पाहून मुलाला खूप आनंद होतो. 

मात्र याचदरम्यान एक मोठी घडना घडते. हा चिमुकला लाकूड उचलण्याऐवजी नकळत साप उचलतो. 

मुळात खेळताना, पहिल्यांदा कुत्रा सापापर्यंत पोहोचतो आणि त्याला पाहून तो पळून जातो. मात्र मुलाला ते समजत नाही आणि तो सापाला उचलतो. 'द सन'ने आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

मुलाने सापाला उचलताच त्याला फेकण्याचा प्रयत्न केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसतोय. दरम्यान हा व्हिडीओ कधीचा, कुठचा आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

कुत्र्यासोबत खेळताना लहान मुलं कशी मोठी चूक करतात ज्यामुळे त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो हे यात दिसून येते. व्हिडिओमध्ये चिमुकला खूप मस्ती करताना दिसतोय. या मुलाचे पालक त्याचा व्हिडिओ बनवण्यात व्यस्त आहेत. हा व्हिडिओ ब्रिटीश वृत्तपत्र 'द सन'ने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केलाय.