Weird News: विना कपडे एअरपोर्टवर नाचू लागली महिला आणि...

 ही घटना डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली.

Updated: Oct 13, 2021, 08:22 PM IST
Weird News: विना कपडे एअरपोर्टवर नाचू लागली महिला आणि... title=

लंडन : आपण केव्हा ही प्रवास करतो तेव्हा आपण नेहमीच चांगले कपडे घालून घरातून बाहेर पडतो. त्यात मुली म्हटलं की, त्यांचं नटनं मुरडनं हे सगळं केल्याशिवाय त्या घराच्या बाहेर पडत नाही. त्यामुळे प्रवासादरम्यान तुम्ही नेहमीच चांगले कपडे घालून लोकं रेल्वे प्रवास किंवा विमानप्रवास करताना तुम्ही पाहिले असाल. मग अशा ठिकाणी एखादा व्यक्ती नग्न अवस्थेत तुमच्यासमोर आली तर? आता तुम्ही म्हणालं की, असं कोणी करतं का? किंवा असं होऊ शकत नाही हे तुमचं उत्तर असेल.

परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की खरेच असं घडलं आहे.  होय, अशीच एक घटना अमेरिकेतील एका विमानतळावर घडली आहे. येथे एक महिला कपड्यांशिवाय दिसली. लोकांची नजर त्या महिलेवर पडताच सर्वांना या घटनेचा धक्काच बसला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

डेली मेलमधील एका रिपोर्टनुसार, ही घटना अमेरिकेतील डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली, जेव्हा एक महिला विमानतळाच्या आत कपड्यांशिवाय फिरू लागली. कधी ती महिला प्रवासी नाचत होती, तर कधी ती जोरजोरात हसत होती. तिथे उपस्थित लोकांची नजर तिच्यावर पडली तेव्हा त्यांना धक्काच बसला आणि त्यांनी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये तिचा व्हिडीओ बनवला.

महिला नाचताना दिसली

मिळालेल्या माहितीनुसार, महिला विमानतळाच्या बाहेर पडण्याच्या गेटजवळ कपड्यांशिवाय नाचताना दिसली होती. त्यानंतर तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांची टीम तिच्याकडे धावली आणि तिला चादरीने झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला प्रवाशाला पकडण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना खूप संघर्ष करावा लागला.

बातमीनुसार, महिलेकडे कोणतेही सामान नव्हते आणि ती फक्त हातात बाटली घेऊन जात होती, ज्यामध्ये अल्कोहोलयुक्त पेये किंवा पाणी असू शकते. महिलेला पकडल्यानंतर तिला पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात नेले.

डेन्व्हर पोलीस विभागाच्या म्हणण्यानुसार, ही घटना गेल्या महिन्यात घडली होती, परंतु काही दिवसांनंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. गेल्या महिन्यात, 19 सप्टेंबर रोजी, महिला टर्मिनल गेट A37 जवळ नशेत सापडली होती. तसेच महिलेची वैद्यकीय स्थितीही चांगली नसल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.