Yemen Stampede : येमेनमध्ये दुर्घटना, चेंगराचेंगरी, 78 ठार; 13 जण गंभीर

Yemen Stampede : प्रचंड गर्दी झाली आणि ही गर्दी नियंत्रणात आणता न आल्याने चेंगराचेंगरी होऊन 78 लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर चेंगराचेंगरीत 12 पेक्षा जास्त लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयाद दाखल करण्यात आले आहे.या दुर्घटनेप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 20, 2023, 11:38 AM IST
Yemen Stampede : येमेनमध्ये दुर्घटना, चेंगराचेंगरी, 78 ठार;  13 जण गंभीर title=

Yemen Stampede : येमेनच्या सनामध्ये अनियंत्रित गर्दीमुळे मोठी दुर्घटना घडली. येथे चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळे 78 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात डझनभर लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार 13 लोकांची स्थिती गंभीर आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. ईदपूर्वी देणगी गोळा करण्यासाठी सर्वजण शाळेत आले होते. मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्रचंड गर्दी नियंत्रणात आली नसल्याने चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना येमेनची राजधानी साना येथे घडली आहे. या चेंगराचेंगरीत 78 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चेंगराचेंगरीत 12 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  एका कार्यक्रमात साहित्याचे वाटप सुरु असताना ते घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली आणि चेंगराचेंगरी झाली. हुथी-समर्थित सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही मोठी दुर्घटना पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवसांत घडली आहे. काही व्यापारी देणगी स्वरुनपात साहित्याचे वितरण करत होते. त्यावेळी ही अत्यंत दुःखद घटना घडली.

शाळेत देणगी जमा करण्यासाठी लोक जमले होते. यावेळी मोठी गर्दी झाली होती. चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्यानंतर मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरु करण्यात आले. यावेळी मतद करणाऱ्या दोन प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, शाळेत शेकडो लोक देणगी गोळा करण्यासाठी जमले होते. प्रत्येकाला 5,000 येमेनी रियाल किंवा सुमारे  9 अमेरिकन डॉलर मिळणार होते. मात्र यादरम्यान चेंगराचेंगरी झाली.

 दरम्यान, येमेनच्या अंतर्गत मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, देणगीचा हा कार्यक्रम दोन व्यावसायिकांनी आयोजित केला होता. त्यांना या दुर्घटनाप्रकरणी जबाबदार धरण्यात आले असून या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चेंगराचेंगरीची कारणे शोधली जात आहेत.