रेल्वे दुर्घटनांवर बोलला भज्जी आणि....
उत्तर प्रदेशात एका आठवड्यात दोन रेल्वे अपघात झालेत. कानपुर आणि इटावाच्यामध्ये औरेया जिल्ह्यात बुधवारी अपघात झाला. आजमगड ते दिल्ली जाणारी १२२२५ (अप) या कैफियत एक्सप्रेसची डंपरला टक्कर दिल्याने ही दुर्घटना घडली.
मुंबई : उत्तर प्रदेशात एका आठवड्यात दोन रेल्वे अपघात झालेत. कानपुर आणि इटावाच्यामध्ये औरेया जिल्ह्यात बुधवारी अपघात झाला. आजमगड ते दिल्ली जाणारी १२२२५ (अप) या कैफियत एक्सप्रेसची डंपरला टक्कर दिल्याने ही दुर्घटना घडली.
ज्यामध्ये ट्रेनचे १२ डब्बे रूळावरून घसकले आणि यामध्ये ७८ लोक जखमी झाले. ही दुर्घटना घडल्यावर चहुबाजूंनी प्रतिक्रिया येत असताना टीम इंडियाचा खेळाडू हरभजन सिंह याने देखील आपला राग ट्विटरवर जाहीर केला आहे. आणि जखमी लवकरच बरे होतील अशी आशा केली आहे.
त्याने ट्विटमध्ये म्हटलं की, एवढ्या कमी वेळात आणखी एक ट्रेन दुर्घटना. योग्य सुरक्षांचा वापर करून आपण हे अपघात रोखू शकत नाही का? आशा करतो की जे लोकं या अपघातात जखमी झाले आहेत ते लवकरच बरे होतील. भज्जीच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. यामध्ये काहींनी भज्जी ला तू राजकारणात जा... असा सल्ला देखील दिला आहे.
गेल्या चार दिवसांत २ मोठे रेल्वे अपघात झाले आहे. शनिवारी ओडिसाच्या पुरीवरून उत्तराखंडच्या हरिद्वारला जाणारी कलिंगा उत्कल एक्सप्रेसला अपघात झाला. हा अपघात मुजफ्फरनगर जिल्ह्यातील खतौलीमध्ये झाला आहे. उत्कल एक्सप्रेसचे १४ डब्बे रूळावरून घसरले आहेत. यामध्ये २४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी उत्तर प्रदेशच्या अलीगढ शहरात कैफियत एक्सप्रेस देखील रूळावरून घसरल्याने ही दुर्घटना घडली.