Amir Khan Mother Admitted: आपल्या सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) यांच्या आई झीनत हुसैन (Zeetan Hussain) यांनी मुंबईतील ब्रीच कॅंडी रूग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं असून त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart attack) आल्याची बातमी समोर येते आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आमिर खानच्या आई पाचगणीजवळच्या त्यांच्या घरात राहत होत्या. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना ताबडतोब रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमिर खान या बातमीनं दुखावला गेला आहे. सध्या त्यांच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आमिर खानच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक बातमी आहे. नुकताच आमिर खाननं आपल्या आईचा वाढदिवस परिवारासमवेत साजरा केला होता. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (aamir khan mother hospitalized in breach candy hospital heart attack)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खान यांच्या मातोश्री झीनत यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याचं कळतं आहे. आमिर खानच्या आई झीनत उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत. त्या हळूहळू बऱ्या होत आहेत. अद्याप आमिर खान किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून कुठलीच अधिकृत माहिती आलेली नाही. काही महिन्यांपुर्वी झीनत यांना करोनाचीही (Corona) लागण झाली होती. 


हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?


आमिर खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून आमिरनं एका मुलाखतीत आपल्याला आपल्या कुटुंबियांना हवा तसा वेळ देता येत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. करण जोहरच्याही (Karan Johar Show) शोमध्ये त्यानं सांगितलं होतं की त्याच्या जीवनातला सगळ्यात हळवा कोपरा म्हणजे त्याचं कुटुंब. आपल्या कुटुंबाला आपण वेळ देऊ शकत नाही याची खदखद त्यानं या कार्यक्रमात व्यक्त केली होती. आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नसला तरी आपलं काम आपलं कुटुंब आवर्जून पाहत आणि कामाचं कौतुक करतं अशी आठवणही त्यानं सांगितली होती. 



हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य


आमिर खानच्या मुलीचा साखरपुडा (Aamir Khan Daugther Engagement)
आमिर खानसह आमिर खानची मुलगी आयरा खानही (Ira Khan) सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. नुकताच तिनं इन्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल केला होता. तिचा मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यानं तिला गुडघे टेकून प्रमोज केलं होतं आणि तिला अंगठी घातली होती. हा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 


आमिर खानच्या कमबॅक चित्रपट ठरला फ्लॉप 
आमिर खानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा त्याचा कमबॅक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यावेळी या चित्रपटाला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा प्रचंड विरोध सहन करावा लागला होता. हा चित्रपट सध्या ओटीटीवर (Films Releasing on ott this weekend) प्रदर्शित झाला आहे.