मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड, मालिकांविश्वातून अनेक कलाकारांचं निधन झाल्याच्या धक्कादायक घटना एकामागोमाग एक येत आहेत. एप्रिल महिन्यात इरफान खान, ऋषी कपूर यांचं निधन झालं. आता आणखी एका कलाकाराचं निधन झाल्याची घटना समोर आली आहे. प्रसिद्ध कॉमेडियन आणि बॉलिवूड अभिनेता मोहित बघेल (Mohit Baghel)याचं निधन झालं आहे. मोहित गेल्या कित्येक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होता. अखेर वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी तो कर्करोगाशी लढाई हरला. राज शांडिल्य यांनी ट्विट करत मोहितच्या निधनाची बातमी दिली. राज यांच्या ट्विटनंतर संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या कित्येक दिवसांपासून मोहितवर नोएडामध्ये उपचार सुरु होते. अखेर त्याची ही कॅन्सरशी लढाई अयशस्वी ठरली. मोहित बघेलने मोठ्या मेहनतीने छोट्या आणि मोठ्या पडद्यावरही आपली खास ओळख निर्माण केली. 2011 मध्ये मोहितने सलमान खानसोबत रेड्डी चित्रपटात छोटे अमर चौधरी ही भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्याने जय हो या सुपरहिट चित्रपटातही भूमिका साकारत आपली वेगळी ओळख बनवली होती.



कहानी घर घर की मालिकेतील 'या' अभिनेत्याचं निधन


मोहितचा जन्म 7 जून 1993 मध्ये मथुरामध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. त्याने शाळा-कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांमध्ये सहभाग घेतला होता. इतक्या लहान वयात मोहितच्या अशा एक्झिटने, त्याच्या निधनानंतर कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. देशभरात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे कलाविश्वात एकामागे-एक कलाकाराचं जाणं धक्कादायक आहे.


'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याचं कर्करोगामुळे निधन


'पिके' फेम अभिनेत्याचं निधन