मुंबई : एखादा कलाकार बदललेल्या रुपात आपल्यासमोर येतो तेव्हा त्याच्यामध्ये झालेले बदल पाहताना प्रेक्षक म्हणून आपणही आश्चर्यचकित होतो. अशीच एक अभिनेत्री सध्या एका नव्या रुपात समोर आली आहे. 2013 मध्ये बालक पालक अर्थात 'बीपी' या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटात तिनं साकारलेली चिऊ सर्वांचीच मनं जिंकून गेली. एक वेगळा विषय अतिशय प्रत्ययकारीपणे हाताळला गेल्यामुळं हा चित्रपट प्रचंड गाजलाही. हीच चिऊ, म्हणजेच भाग्यश्री 'आनंदी गोपाळ' या चित्रपटातूनही तिच्या दमदार अभिनयाची झलक दाखवून गेली. 


चित्रपटात तिनं साकारलेली भूमिका पाहताना तिचा सोज्वळपणा सर्वांचीच मनं जिंकून गेला. एक अभिनेत्री म्हणून भाग्यश्री नावारुपास येत असतानाच तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांशी एक वेगळं नातं जपलं. 


याच सोशल मीडियामुळं ती पुन्हा चर्चेत आली आहे. निमित्त ठरत आहेत ते म्हणजे तिनं शेअर केलेले काही फोटो. साडी, त्याला साजेसा मेकअप आणि रोखलेली नजर असा तिचा लूक पाहताक्षणी काळजाला हात घालत आहे. 



भाग्यश्रीनं शेअर केलेल्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 'शर्म थोडी थोडी हम को आए तो नज़रे झुक जाए; सितम थोडा थोडा हम पे शोख हवा भी कर जाए' असं कॅप्शन देत तिनं या पोस्टला चार चाँद लावले आहेत. तुम्हाला कसा वाटला तिचा हा लूक?