मुंबई : महिलांच्या बाबतीत समाजात असणारे पूर्वग्रह अद्यापही दूर झालेले नाहीत. अनेक प्रसंगांतून हीच बाब समोर येते. लग्नानंतर तर महिलांना पावलोपावली काही अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं, की हा स्वप्नवत वाटणारा प्रवास अनेकजणींसाठी काहीसा अडथळ्यांनी भरुन जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री काम्या पंजाबी हिलाही अशाच प्रसंगांचा सामना करावा लागला होता. पहिलं लग्न तुटल्यानंतर काम्याला बऱ्याच विचित्र प्रतिक्रिया आणि अनेकांच्याच रोषाला सामोरं जावं लागलं होतं. 


काम्याला पहिल्या लग्नात आलेल्या वादळावरुन तिला बरंच काही बोलण्यात आलं. शिवीगाळही झाली. या साऱ्यामुळे ती तुटली होती, तिला अश्रूही अनावर झाले. काम्याला मिळालेली ही वागणूक फक्त तिलाच नव्हे, तर समाजातील अनेक महिलांनकित्येकदा तर नात्याच्या बंधनातून मुक्त झालेले पुरुष सुखाचं आयुष्य जगतात. पण, महिलांना मात्र अवहेलनाच सहन करावी लागते. समाजाच्या या चालीरिती कुठेतरी थांबणं गरजेचं आहे.


काम्यानं तिच्यासोबत घडलेल्या या प्रसंगाचा खुलासा केला. पण, समाजात अशा अनके महिला आहेत ज्या त्यांच्याशी होणारी गैरवर्कणूक आणि इतर अनेक संकटांबाबत बोलणंही टाळतात.अशा महिला परिस्थितीपुढे अनेकदा हात टेकतात. तर काही परिस्थितीवर टिच्चून उभ्या राहतात.