तब्बूनं अविवाहीत असण्यासाठी `या` अभिनेत्याला धरलं जबाबदार, म्हणाली `लहानपणापासून तो...`
`मी आजही अविवाहीत आहे, कारण...`, अभिनेत्री तब्बूनं केला धक्कादायक खुलासा
Bollywood Movie Drishyam 2 : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि तब्बू हे दोन्ही कलाकार लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच अजयचा 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अजयच्या 'दृश्यम 2' ला चित्रपटला समीक्षक आणि प्रेक्षकांचा (Audience) चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. खरंतर चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या 3 दिवसांमध्येच चित्रपट सुपरहिट (Movie Superhit) ठरला आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 'दृश्यम 2' नं बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कमाई केली आहे. अजय देवगण आणि तब्बू यांनी एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 90 च्या दशकातील 'विजयपथ' ते 1995 मध्ये आलेल्या 'हकीकत' या चित्रपटात अजय आणि तब्बूची जोडी चांगलीच आवडली होती. हे दोन्ही स्टार्स (Stars) बालपणीचे मित्र आहेत आणि सुरुवातीपासूनच एकमेकांच्या खूप जवळ आहेत. (actress Tabu blames famous bollywood actor ajay devgn for being single Drishyam 2 nz)
अजयमुळे तब्बू कायम सिंगल
52 वर्षीय तब्बू अजूनही सिंगल (Single) आहे. अभिनेत्रीने कधीही लग्न केले नाही आणि नात्यात प्रवेश केला नाही. मुंबई मिररला (Mumbai Mirror) दिलेल्या मुलाखतीत तब्बूने अजय देवगणला सिंगल असण्याचे कारण सांगितले. तब्बू म्हणाली होती, "अजय हा माझा चुलत भाऊ समीर आर्यचा शेजारी आणि चांगला मित्र होता. आम्ही तिघेही लहानपणापासून एकत्र आहोत.
मी लहान असताना समीर आणि अजय माझी हेरगिरी करायचे. अजय कोणत्याही मुलाला मारण्याची धमकी द्यायचा. जो माझ्याशी बोलत असे. "तब्बू पुढे म्हणाली, "त्यावेळी अजय आणि समीर मोठे गुंड होते आणि त्यांच्यामुळे मी आजही अविवाहित आहे. पण मला आशा आहे की आज अजय आणि समीरला त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होत असेल."
हे ही वाचा - सुप्रसिद्ध Bollywood Star's च्या लेकींनी बिकिनीमध्ये घातला धुमाकूळ, Star Kid's चे Photo Viral
तब्बूने अजयला मुलगा शोधण्याची जबाबदारी दिली
एंटरटेनमेंट न्यूजच्या वृत्तानुसार, तब्बूने एका मुलाखतीदरम्यान (Interview) सांगितले होते की, तिने अजय देवगणला त्याच्यासाठी मुलगा शोधण्याची जबाबदारी दिली होती. ती म्हणाली होती, "माझा कोणावर विश्वास असेल तर तो फक्त अजय आहे. तो खूप प्रोटेक्टिव (Protective) आहे. जेव्हा तो सेटवर असतो तेव्हा वातावरण खूप खेळीमेळीचे असते. आम्ही एकमेकांना खूप साथ देतो.