Alia Bhatt Celebrate Diwali: सध्या बॉलिवू़मध्ये दिवाळीचा झगमगाट पाहायला मिळत आहे. अनेक बड्या कलाकारांकडे दिवाळी पार्टीचे आयोजन केले आहे. बॉलिवूड सेलेब्स दिवाळीचा सण उत्साहात साजरा करत आहेत. अशावेळेस बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टही आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा सण साजरा करताना दिसत आहे. गेल्या दिवसांमध्ये झालेल्या कोणत्याही दिवाळी पार्टीत अभिनेत्री आलिया दिसली नाही आणि विशेष म्हणजे रणबीरही पत्नीच्या काळजीपोटी कोणत्याही पार्टीचा भाग बनला नाही. पण तिनं तिच्या कुटूबियांसोबत दिवाळी साजरी केली सोशल मीडियावर पोस्टद्वारे चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या. (Alia Bhatt Celebrate Diwali in the room while everyone was enjoying Diwali 2022 nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



हे ही वाचा - T20 World Cup : IND vs PAK सामन्यादरम्यान ऋषभ पंतला अशी वागणूक का मिळाली? Video Viral



आलियाची थ्रोबॅक फोटो येथे पहा


आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर दिवाळीच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'हॅपी दिवाळी थ्रोबॅक, मला यावर्षी अंथरुणावर दिवाळी साजरी करायची आहे, सर्वांवर प्रेम करा.' आलिया भट्टने या पोस्टसोबत दोन फोटोही शेअर केले आहेत, एक फोटो गेल्या वर्षीचा आहे. , ज्यामध्ये ती हातात दिवा घेऊन दिसत आहे, तर दुसरा फोटो या वर्षातील आहे, ज्यामध्ये आलिया बंद खोलीत आहे.  बेडवर पडली आहे आणि मेकअपशिवाय ती खूप गोड दिसत आहे. त्या फोटोत तिची आवडती मांजर एडवर्ड  देखील आहे. तिनं स्मित हास्य करत चिडवण्याच्या नादात जीभ काढत तिनं तो फोटो शेअर केला आहे. कदाचित बाळाच्या संरक्षणाकरिता कोणत्याही दिवाळी पार्टीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असावा. असो.. पण त्या फोटोत ती कमाल सुंदर दिसत आहे.


 



 


हे ही वाचा - दिवाळीत उधळले जातायत प्रेमाचे रंग; पाहा प्रियकरासोबत हृतिकच्या Ex Wife चा सर्वात Romantic अंदाज


 


आलियाच्या फोटोंवर चाहत्यांची कमेंट


आलियाचे चाहते या फोटोंवर सतत कमेंट करत आहेत. आलियाची वहिनी रिद्धिमा कपूर साहनी यावर कमेंट करताना लिहिले की, 'दुसरा फोटो आणि त्यानंतर हार्ट इमोजी पाठवला आहे.' करत आहे. तुम्हाला माहिती आहेच की, आलिया लवकरच आई होणार आहे. तिनं गेल्या महिन्यांमध्ये सगळी कामं आवरली आणि आता पूर्णपणे बेडरेस्ट घेताना दिसत आहे. जे खूप महत्त्वाचं आहे.