Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, `मला आवाज...`
अलका याग्निक यांना व्हायरल अटॅकच्या त्रास झालाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याला चाहत्यांना आणि सहकलाकारांना मोठ्या आवाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
Alka Yagnik Loses Hearing : बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील आघाडीची पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांच्या सुमधुर गाण्याने आजही अनेकांना वेड लावलंय. यांच्या आवाजातील माधुरी दीक्षितपासून श्रीदेवीपर्यंत अनेक अभिनेत्रींवरील असंख्य गाणी आजही कानांना मंत्रमुग्ध करतात. पण आज याच आवाजापासून अलका या दूर गेल्या आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना प्रार्थना करायला सांगितलंय. या पोस्टनंतर चाहत्यांना धक्का बसलाय.
अलका यांनी सांगितले की, व्हायरल अटॅकनंतर त्यांना त्रास झाला आणि एके दिवशी फ्लाइटमधून बाहेर पडताना त्यांना कळले की आपल्याला काहीच ऐकू येत नाही. या समस्येबद्दल माहिती देताना त्यांनी चाहते आणि सहकारी कलाकारांना एक महत्त्वाचा सल्लाही दिलाय. अलका यांना दुर्मिळ आजाराने ग्रासल असून त्यांना दोन्ही कानांनी ऐकायला येत नाही आहे. (Alka yagnik loses hearing due to rare neuro disorder after viral attack)
अलका यांनी काय लिहिलंय पोस्टमध्ये?
अलका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय की, 'माझ्या सर्व चाहते, मित्र, फॉलोअर्स आणि हितचिंतकांसाठी... काही आठवड्यांपूर्वी, जेव्हा मी फ्लाइटमधून उतर होती, तेव्हा मला अचानक असं वाटलं की मला काहीही ऐकू येत नाही. या घटनेनंतर काही आठवड्यांत थोडे धाडस करून, मी आता माझ्या सर्व मित्रांसाठी आणि हितचिंतकांसाठी माझं मौन सोडू इच्छितो... जे मला विचारत आहेत, तुम्ही सध्या कुठे आहात. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे मला व्हायरल अटॅकमुळे एक दुर्मिळ सेन्सोरिनरल नर्व्ह या आजारामुळे मला ऐकू येत नाही आहे. माझी श्रवणशक्ती कमी झाली आहे आणि मला केस गळतीचा त्रास होतोय. धानीमनी नसताना अचानक माझ्यावर मोठ्या आघात झाला.
हेसुद्धा वाचा - Hearing Loss Symptoms : कानाने कमी ऐकू येतंय? जाणून घ्या लक्षणं, कारण आणि उपचार
अलका पुढे म्हणाल्यात की, 'मी या आजाराला स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे, दरम्यान कृपया मला तुमच्या प्रार्थनेची आवश्यकता आहे. यासोबतच त्यांनी चाहत्यांना आणि गायकांना सल्ला दिलाय. त्या म्हणतात की, 'मी माझ्या चाहत्यांना आणि तरुण सहकाऱ्यांना हेडफोन्स आणि मोठ्या आवाजातील संगीतापासून दूर राहा. एखाद्या दिवशी मी माझ्या व्यावसायिकांतून आरोग्याला होणाऱ्या हानीबद्दल नक्कीच बोलेन. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने, मी माझे आयुष्य पुन्हा रुळावर आणेल आणि लवकरच तुम्हाला पुन्हा भेटेल.'
नेटकऱ्यांनी 2022 मध्ये अलका यांची गाणी सर्वाधिक ऐकली होती. अलका यांनी यूट्यूबवरील स्ट्रिम चार्टमध्ये पहिला क्रमांक पटकावला असून टेलर स्विफ्ट, ड्रेक आणि बेयॉन्से यांसारख्या जगातील सर्वात प्रसिद्ध गायकांना मागे टाकलंय.