Hearing Loss Symptoms : कानाने कमी ऐकू येतंय? जाणून घ्या लक्षणं, कारण आणि उपचार

Health Tips : प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याग्निक यांना दोन्ही कानांने ऐकू येत नाही. सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस हा आजार त्यांना झालाय. तुम्हालाही कानाने कमी ऐकू येतं? मग लक्षणं, कारण आणि उपचार जाणून घ्या. 

Jun 18, 2024, 14:42 PM IST
1/7

शरीरातील पाच ज्ञानेंद्रिय म्हणजेच कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ही अत्यंत महत्वाची असून महत्त्वाची भूमिका बजावतात. 

2/7

हिअरिंग लॉस यामध्ये रुग्णाला एका किंवा दोन्ही कानाने कमी किंवा पूर्ण ऐकू येत नाहीत. अलका याग्निक यांनाही सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉसचा त्रास होतोय. 

3/7

तुम्हालाही वाटतं का कानाने कमी ऐकू येतंय? मग लक्षणं, कारण आणि उपचार याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

4/7

हिअरिंग लॉस म्हणजे श्रवणशक्ती कमी होतं तेव्हा पुढील लक्षणं दिसतात. ऐकण्यास अडचण येणे, गोष्टी ऐकू येतात पण समजण्यास त्रास होतो, तीच गोष्ट वारंवार सांगणे किंवा पुन्हा सांगणे, खूप थकवा जाणवणे, कानात सतत आवाज जाणवणे, डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवणे आणि काहीच ऐकू न येणे. 

5/7

वाढत्या वयाबरोबर ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्याशिवाय अति आवाजाच्या ठिकाणी काम केल्यामुळे, कुटुंबातील अनुवांशिक विकार, ऑटो इम्यून रोगाने ग्रस्तरुग्ण आणि ऑटोटॅक्सिस औषधे घेतल्याने ही समस्या निर्माण होते. 

6/7

ऐकण्याची क्षमता कमी किंवा कमकुवत असल्यास डॉक्टर सुरुवातीच्या टप्प्यात काही औषधं देतात. कानाची श्रवणशक्ती पूर्णपणे खराब झाल्यास मशीन बसविण्याचा सल्ला दिला जातो. 

7/7

श्रवणशक्ती कमी होण्याची अनेक कारणे असतात, पण तुम्हाला ही अडचण येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क करावा. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)