धक्कादायक! `ते` खासगी फोटो वापरत अभिनेत्रीला केलं ब्लॅकमेल, शेवटी तिनं...
अभिनेत्रीनं एक्स बॉयफ्रेंड विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : दाक्षिणात्या चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉलच्या एक्स बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली आहे. अमला पॉलनं विल्लुपुरम जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात माजी बिझनेस पार्टनर आणि एक्स बॉयफ्रेंड भावनिंदर सिंग याच्यावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती. यानंतर अमला पॉलच्या एक्स बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीनं भवनिंदर सिंगवर खाजगी फोटो वापरत तिला ब्लॅकमेल आणि फसवणुकीचा आरोप केला आहे.
आणखी वाचा : गणपतीच्या आगमणासोबत रितेश-जिनिलियाच्या घरी 'या' पाहूण्यानं केली एण्ट्री
अमला पॉलनं तक्रार केल्यानंतर एका दिवसानंतर तिच्या एक्स बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली आहे. याआधी अमलानं 2020 मध्ये या व्यक्तीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर अमलानं दावा केला की भावनिंदरने तिच्या खासगी फोटोशूटचे काही फोटो चुकीच्या पद्धतीनं प्रकाशित केले होते. दोघांनी मिळून एक प्रॉडक्शन कंपनी सुरू केली पण नंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं.
आणखी वाचा : बुडत्या Bollywood ला क्रिकेटर्सचा आधार; रणवीर-रणबीरला मिळणार डच्चू?
आणखी वाचा : 'जो चार लोकांसमोर आपलं नाव घेऊ शकत नाही....', जेव्हा रेखा यांच्यावर जया बच्चन संतापल्या
अमला पॉलनं भाविंदरवर कंपनीच्या संचालकपदावरून हटवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप केला. तसेच तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी दिली. अमला पॉलच्या तक्रारीवरून पोलिसांनी भावनिंदर सिंगला अटक करून त्याच्याविरुद्ध धमकावणे, छळ करणे आणि खोटारडेपणाचे कलम लावले.
आणखी वाचा : अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरमुळे गोंधळ; ट्विंकलनं पतीकडून घेतलं 'हे' वचन
काही वर्षांपूर्वी अमाला पॉल आणि भावनिंदर सिंग एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. दरम्यान, दोघांनी कधीही दुजोरा दिला नाही. 2020 मध्ये भावनिंदरनं अमला पॉलसोबतचे काही फोटोही शेअर केले होते, ज्यामध्ये दोघेही लग्नात जोडपं घालतं त्या वेषात दिसले. या फोटोंनंतर अमला पॉल आणि भावनिंदरचे लग्न झाल्याची चर्चा सुरू झाली. पण अमाला पॉलनं ते फोटो 2018 मध्ये केलेल्या फोटोशूटमधील असल्याचे स्पष्ट केले आणि फोटो सोशल मीडियावरून काढून टाकले. तेव्हा अमला पॉल आणि भावनिंदर विभक्त झाले.