Amitabh Bahchan major accident on Coolie's set : बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bahchan) यांचा हैदराबादमध्ये चित्रपटाची शूटिंग करत असताना त्यांना दुखापत झाली. याविषयी अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉग द्वारे माहिती दिली होती. तर अमिताभ यांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातानंतर त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला आहे. त्यांना एका जागेवरून हलताही येत नाही. अमिताभ यावेळी त्यांचा आगामी चित्रपट 'प्रोजेक्ट के' (Project K) च्या चित्रपटासाठी शूटिंग करत होते. दरम्यान, अमिताभ यांचा पहिल्यांदाच अपघात झाला नाही. या आधी देखील अमिताभ यांचा एक गंभीर अपघात झाला होता. त्यावेळी अमिताभ यांची अशी गंभीर परिस्थिती झाली होती की डॉक्टरांनी अमिताभ यांची पत्नी जया बच्चन यांना निरोप दिला होता की तुम्ही एकदा शेवटचे त्यांना भेटून घ्या... अमिताभ यांचा हा अपघात कधी झाला होता आणि त्यावेळी नेमकं काय झालं होतं असा प्रश्न तुम्हालाही असेल... चला तर जाणून घेऊया हा गंभीर अपघात नेमका कसा आणि केव्हा झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ यांचा हा गंभीर अपघात 1982 साली प्रदर्शित झालेल्या 'कुली' (Coolie) या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाला होता.  'कुली' चित्रपटाचा सेट बंगळुरूपासून 16 किमी अंतरावार होता. सेटवर असतानाच हा गंभीर अपघात झाला होता. अॅक्शन सीनचे चित्रीकरण करत असताना पुनीत इस्सर यांनी अमिताभ यांनी पोटात जोरात मुक्का मारला. पुनीत यांनी मुक्का मारताच अमिताभ यांना त्या सीनमध्ये उडी मारायची होती. पण जेव्हा अमिताभ यांनी उडी मारली तेव्हा त्यांना टेबलाचा कोपरा लागला आणि ज्या जागेवर मुक्का मारला होता त्याच जागेवर टेबलाचा कोपरा लागला. त्यानंतर अमिताभ यांना खूप त्रास झाला आणि लगेचच ते शूटिंग सोडून हॉटेलवर परतले. त्यांनी आराम केला मात्र, बिग बींच्या दुखणं कमी झालं नाही आणि त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  


रुग्णालयात लगेचच अमिताभ यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रिज कॅंडी रुग्णालयात हलवण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, अमिताभ यांच्या तब्येतीच सुधारणा होत नसल्याचे पाहत डॉक्टरांनी त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया केली. याविषयी अमिताभ यांनी 2015 साली केलेल्या त्यांच्या एका ब्लॉगमध्ये याचा खुलासा केला. अमिताभ यांच्यावर जवळपास 8 दिवस उपचार सुरु होते. तरी देखील त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत नव्हती. त्यावेळी डॉक्टरांनी देखील सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या. अशात जेव्हा जया बच्चन या आयसीयूमध्ये अमिताभ यांना भेटायला जात होत्या तेव्हा डॉक्टरांनी पतीला शेवटचं भेटून घ्या असेही सांगितले होते. 


हेही वाचा : Amitabh Bachchan Injured : अ‍ॅक्शन सीनदरम्यान अमिताभ बच्चन जखमी, जाणून घ्या कशी घडली घटना


दरम्यान, अमिताभ यांनी पुढे सांगितले की डॉक्टर उडवाडिया यांनी एकदा शेवटचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. त्यावेळी अमिताभ यांच्या पायाचा अंगठा हलू लागला आणि याकडे सगळ्यात आधी जया बच्चन यांचे लक्ष गेले होते. अखेर दोन महिने रुग्णालयात राहिल्यानंतर अमिताभ घरी परतले.