Ranbir Kapoor Throw phone: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मागील काही चर्चेचा विषय आहे. रणबीरच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Ranbir Kapoor Upcoming Movies) झालाय. श्रद्धा कपूर सोबतच्या या ट्रेलरमुळे तो सध्या तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलाय. अशातच आता रणबीरचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Ranbir Kapoor Angry Video) तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे रणबीर प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे. त्याच्या एका कृतीमुळे अनेकांचा पारा चढल्याचं पहायला मिळतंय. (Angry ranbir kapoor misbehave with fans and thrown fan mobile phone Video goes Viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर अनेक ठिकाणी हजेरी लावताना दिसतोय. रणबीर आलाय म्हटल्यावर गर्दी तर होणारच. रणबीर कुठेही आला तरी त्याच्या भोवती गराडा पहायला मिळतो. अशातच रणबीरने एका ठिकाणी भेट दिली असतानाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये एक चाहता (Angry ranbir kapoor misbehave with fan) रणबीरसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. मात्र, वारंवार प्रयत्न करूनही त्याला फोटो क्लिक करता आला नाही. 


आणखी वाचा - Ranbir Kapoor Birthday:अभिनेता रणबीर कपूर इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक? जाणून घ्या


रणबीरने दोन तीन वेळा फोटोसाठी पोज दिली. मात्र, फोटो काही क्लिक झालाच नाही. त्याला राग अनावर झाला. रागाच्या भरात (Ranbir Kapoor Throw phone) रणबीरने फोन चाहत्याच्या हातातून घेतला आणि फेकून दिला. त्यानंतर त्याचा फॅन त्याला पाहत राहिलेला दिसतोय. सध्या हा व्हिडिओ व्हायरल (Ranbir Kapoor Viral Video) होताना दिसतोय.


पाहा Video - 



दरम्यान, रणबीर कपूरचा हा व्हिडिओ (Ranbir Kapoor Video) सेलिब्रिटी फोटोग्राफर 'विरल भयानी'ने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर (Ranbir Kapoor Upcoming Movies) अनेकांनी रणबीरच्या येत्या मुव्हीचं प्रमोशन असल्याचं म्हटलंय तर, अनेकांनी हा कोणता माज?, असा सवाल उपस्थित केलाय. त्यामुळे आता बॉलिवूडचा चॉकलेट बॉय आता अँग्री मॅन झालाय, असं म्हटलं जात आहे.