मुंबई : Ranbir Kapoor Net Worth बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर बॉलिवूड विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त (Ranbir Kapoor Birthday) त्याच्या फिल्मी करीअर आणि रिअल लाईफबद्दलचे काही किस्से जाणून घेऊयात.
रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2007 मधील सावरिया ते 2022 मधील ब्रह्मास्त्र (Brahmastra) पर्यंत रणबीरने खूप मोठा पल्ला गाठला.या दरम्यान त्याने चॉकलेटी हँडसम हिरोच्या प्रतिमेतून बाहेर पडत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. या त्याच्या दमदार अभिनयामुळे तो बॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता ठरला आहे.
फिल्मी करिअर
रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor Birthday) जन्म 28 सप्टेंबर 1982 रोजी झाला. कपूर कुटुंबात जन्मलेला रणबीर सुरुवातीपासूनच त्याचे आजोबा राज कपूर यांचा लाडका होता.
रणबीरने (Ranbir Kapoor) 2007 मध्ये सावरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु त्याआधी त्याने संजय लीला भन्साळी यांना ब्लॅक चित्रपटात असिस्ट केले होते. रणबीरने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत 19 चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये 'राजनीती', 'रॉकस्टार', 'बर्फी' असे अनेक सिनेमे आहेत.
आलिशान कारचा शौकीन
रणबीर कपूरकडे (Ranbir Kapoor Birthday) एकापेक्षा जास्त आलिशान कारचे कलेक्शन आहे. यामध्ये BMW X6, Lexus, Mercedes Benz GL Class, Audi R8 आणि Range Rover या कारचा समावेश आहे.
ब्रँड प्रमोशनसाठी घेतो इतके कोटी?
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) अनेक ब्रँड्सचे प्रमोशन करतो. ज्यामुळे त्याचा नेट वर्थ सतत वाढत असतो. मीडिया रिपोर्टनुसार रणबीर एका ब्रँड् प्रमोशनसाठी 5 कोटी रुपये घेतो.
संपत्ती किती?
रणबीर कपूर (Ranbir Kapoor Birthday) अभिनयातच नाही, तर श्रीमंतीच्या बाबतीतही कुणाच्याही मागे नाही आहे. पत्नी आलिया भट्ट पेक्षाही दुप्पट संपत्ती त्याच्याकडे आहे. जीक्यू इंडिच्या अहवालानुसार, रणबीर कपूरची एकूण संपत्ती 45 दशलक्ष डॉलर, म्हणजेच भारतीय चलनानुसार (337 कोटी) आहे. तर, आलियाची एकूण संपत्ती 21.7 दशलक्ष डॉलर (158 कोटी रुपये) आहे. त्याच्या संपत्तीचा आकडा वेळोवेळी बदलत असतो.
अशाप्रकारे रणबीर (Ranbir Kapoor) हा अभिनयासह अनेक बाबतीत आघाडीवर आहे.सध्या त्याच्या ब्रम्हास्त्र (Brahmastra) चित्रपटाची खुप चर्चा आहे. हा चित्रपट किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.