Ranjeet Ranjan on Animal movie: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. एकीकडे जिथे काही प्रेक्षक चित्रपटाची स्तुती करत आहेत. दुसरीकडे काही लोक या चित्रपटाला ट्रोल करताना दिसत आहे. चित्रपटात अनेक हिंसक सीन दाखवले आहेत. तर रणबीर कपूरच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. या सगळ्यात हे प्रकरण संसदेत पोहोचलं आहे. कॉंग्रेस संसद रंजीत रंजन यांनी रणबीर कपूरच्या चित्रपटाला घेऊन त्याच्यासोबत घडलेल्या गोष्टीविषयी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रंजन यांनी चित्रपटातील हिंसात्मक सीनवर नाराजी व्यक्त केली असून त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्याचा तरुणांवर चुकीचा परिणाम होत आहे. रंजीत रंजन म्हणाल्या, की त्यांची मुलगी रणबीर कपूरचा 'ॲनिमल' पाहायला गेली आणि मध्यरात्री थिएटर सोडून बाहेर आली आणि घरी आल्यानंतर खूप दु:खी होती. त्यांनी म्हटलं की चित्रपट समाजाचा आरसा असतो. आम्ही देखील चित्रपट बघूनच मोठे झाले आहोत. चित्रपटांमुळे समाजावर खासकरून तरूण पिढीवर प्रभाव पडतो. हिंसा अनेक चित्रपटांमध्ये दाखवण्यात येते. त्यातही आजकाल काही चित्रपटांमध्ये खूप जास्त हिंसा दाखवण्यात येते. आताच एक चित्रपट आलाय, 'ॲनिमल'. माझी मुलीसोबत कॉलेजमध्ये अनेक मुली शिकतात. ती 'ॲनिमल' पाहायला गेली, पण ती चित्रपट अर्धवट सोडून आली आणि रडत रडत थिएटरबाहेर आली. 


हेही वाचा : स्वानंद किरकिरेच्या टीकेवर चक्क 'ॲनिमल' च्या टीमनं दिलं उत्तर; मात्र चर्चा नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्सची


 पुढे त्या म्हणाल्या, 'चित्रपटात महिलांच्या अपमानाचं समर्थन करणं ही योग्य गोष्ट नाही. या चित्रपटात ज्याप्रकारे ते पात्र त्याच्या पत्नीबरोबर वागताना दाखवलं आहे आणि प्रेक्षकही त्याचं समर्थन करताना दिसत आहेत. याबद्दल गांभीर्याने विचार व्हायलाच हवा. यासगळ्याचा तरुण पिढीवर परिणाम होतो. नकारात्मक भूमिकेतील या हिरोंना 11-12 वीतील विद्यार्थी त्यांचा आदर्श मानतात. मला वाटतं की कबीर सिंहमध्ये शाहिद कपूरची भूमिका ज्या प्रमाणे होते. ज्या प्रकारे तो त्याच्या प्रेमीसोबत वागायचा आणि या चित्रपटात ती भूमिका त्याच्या पत्नीसोबत जसं वागतो. त्याला चित्रपटात जस्टिफाय करताना दिसला. त्याचा गांभीर्यानं विचार करायला हवा.'