स्वानंद किरकिरेच्या टीकेवर चक्क 'ॲनिमल' च्या टीमनं दिलं उत्तर; मात्र चर्चा नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्सची

Animal Swanand Kirkires :  'ॲनिमल' चित्रपटाच्या टीमनं स्वानंद किरकिरेला दिलेल्या उत्तरानं नेटकऱ्यांनी वेधलं लक्ष.. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 7, 2023, 06:57 PM IST
स्वानंद किरकिरेच्या टीकेवर चक्क 'ॲनिमल' च्या टीमनं दिलं उत्तर; मात्र चर्चा नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्सची title=
(Photo Credit : Social Media)

Animal Swanand Kirkires : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'ॲनिमल' चित्रपटानं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत असल्याचे सहाव्या दिवशी देखील पाहायला मिळाले. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कोणाला हा चित्रपट आवडला तर कोणाला नाही. या चित्रपटावर टीक करणाऱ्यांपैकी एक म्हणजे कवि आणि अभिनेता स्वानंद किरकिरे आहे. त्यानं हा चित्रपट पाहिल्यानंतर निराशा व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी टीका करतं म्हटलं की चित्रपट पैसे कमावतोय पण भारतीय चित्रपटाचा इतिहासाला लाजवेल असा आहे. त्यावरून आता 'ॲनिमल' च्या टीमनं स्वानंद किरकिरेला उत्तर दिले आहे. 

'ॲनिमल' या चित्रपटाच्या ऑफिशिअर एक्स अकाऊंट म्हणजेच आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून एक क्रिप्टिक पोस्ट शेअर करत स्वानंद किरकिरेला उत्तर दिले आहे. थोडक्यात त्यांनी एका वर्तमानपत्रातील फोटो शेअर करत ही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. फक्त स्वानंद नाही तर या पेजवरून चित्रपट समिक्षक अनुपमा चोप्राला देखील उत्तर दिलं आहे. अनुपमा यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर कमेंट केली होती की त्या कबीर सिंगला मिस करत आहेत. यावर 'ॲनिमल' च्या ट्विटर पेजवरून उत्तर देण्यात आलं आहे. त्यात त्यांनी ‘कबीर सिंह’ चित्रपटाची ओटीटी लिंक शेअर करत लिहिले की तुम्ही तुमचा आवडता कबीर सिंग इथे पाहू शकता. 

स्वानंदला या ट्विटर अकाऊंटवरून उत्तर दिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, संदीप रेड्डी वांगा तुमच्या अधिकृत अकाऊंटवरून बोला. दुसरा नेटकरी म्हणाला, वांगानं चुकून ऑफिशिअर अकाऊंटवरून उत्तर दिलं. तिसरा नेटकरी म्हणाला, 11 वर्षांच्या मुलाप्रमाणे उत्तर दिलं आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, ट्रोल झाल्यावर अल्फा लोकं रडू लागले. 

वाचा काय म्हणाला होता स्वानंद : 'मला सगळ्या स्त्रीयांची दया आली, तुमच्यासाठी नवा पुरुष...'; 'ॲनिमल' मधला रणबीरला पाहून संतापले स्वानंद किरकिरे

दरम्यान, 'ॲनिमल' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर सहा दिवसात भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 312.96 कोटींची कमाई केली आहे.आता वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसविषयी बोलायचे झाले तर त्यांनी 500 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटातील रणबीरची भूमिका ही काहींच्या पसंतीस उतरली आहे तर काहींच्या नाही. या चित्रपटातील रणबीरची रश्मिका आणि तृप्ती या दोघांसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे. त्यांच्या शिवाय या चित्रपटात अनिल कपूर आणि शक्ती कपूर देहत्त्वाच्या भूमिकेत आहेत.तर बॉबी देओल या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे.