मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिनं बऱ्याच कारणांनी सर्वांचं लक्ष वेधलं. य़ामध्ये एक कारण होतं ते म्हणजे ऐश्वर्याचे काही फोटो. या फोटोंमध्ये ती गरोदर असल्यासारखी दिसत होती. तिचा हा फोटो पाहून अनेकांनीच कमेंट करत तू गरोदर आहेस का, असे प्रश्नही ऐश्वर्याला विचारले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्यानं या प्रश्नांची उत्तरं अर्थातच दिली नाही. पण, खरंच ही सौंदर्यवती या वयात गरोदर आहे का, हा प्रश्न अनेकांनाच सतावत होता. मुळात ऐश्वर्याच्या गरोदरपणाचं तिच्य़ा चाहत्य़ांना कौतुक आणि कुतूहल वाटत होतं. वय़ाच्या 47 व्या वर्षी ती गरोदर होऊ शकते का, हा प्रश्नही अनेकांनीच काळजीपोटी उपस्थित केला होता. 


सहसा हे वय गरोदरपणासाठी धोक्याचं समजलं जातं. शरीर हळूहळू थकत चालल्यामुळं या गोष्टी आणि काही प्रश्न उभे राहतात. 45 व्य़ा वर्षी महिला नैसर्गिकरित्या गरोदर होऊ शकतात. पण, असं फार कमीच होतं. या वयात फर्टिलिटी ट्रिटमेंटच्या माध्यमातून मातृत्त्वाचं सुख मिळतं. पम, 45 वर्षांच्य़ा नंतर मेनोपॉज सुरु होऊ शकतो. जर, तुम्हाला 12 महिने सतत मासिक पाळी येते, तर अशा वेळी गरोदरपणात अडचणी कमी येण्याची शक्यता असते. पण, आरोग्याच्या बाबतीत प्रत्येक महिलेचे वेगळे निकष असतात. 


45 व्या वर्षी आणि 30 व्या वर्षी आई होण्यामध्ये फार फरक आहेत. 45 व्य़ा वर्षी गरोदरपणाचं प्रमाण हे 5 टक्के इतकंच असतं. तर, 30 व्या वर्षापर्यंत हे प्रमाण 20 टक्के इतकं असतं. 45 वर्षांनंतर गरदोरपणाचं प्रमाण 1 टक्के इतकंच असतं. 


या वय़ात येतात अनेक अडचणी 
वाढत्या वयासोबतच गरोदरपणात येणाऱ्य़ा अडचणींचं प्रमाणही जास्त असतं. जर, तुम्ही 45 वर्षांच्या नंतर गरोदर आहात, तर जेस्टेशनल डायबिटीज, उच्च रक्तदाब, प्लेसेंटामध्ये अडचणी, सिजेरियन डिलीवरी, एक्टोपिक प्रेग्नेंसी, मिसकॅरेज अशा अनेक अडचणी उदभवू शकतात. अशा वेळी गर्भधारणा झालेल्या महिलेची काळजी घेणं अनिवार्य असतं.