मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. विद्यार्थ्यांसह अनेक बॉलिवूड कलाकार या आंदोलनात सहभागी झाले. काहींनी आंदोलनात सहभाग घेऊन आपला पाठिंबा दर्शवला तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून. दिग्दर्शक अनुराग कश्यपने ट्विट करून 'मोदी म्हणजे भारत नाही' असं म्हणून CAA ला विरोध केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच अनुराग कश्यप सोशल मीडियावर आला आहे. अनुराग कश्यप अनेकदा ट्रोल्सला देखील प्रत्युत्तर देताना दिसतो. असं असताना अनुराग कश्यपने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणं देशद्रोह नाही असं म्हटलं आहे. हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ('या' दोन पाकिस्तानी कलाकारांना मी भारतीय नागरिकत्व मिळवून दिलं - गडकरी) 


 


या ट्विटमध्ये म्हटलंय की,'मोदीची भक्ती, देशभक्ती नाही. मोदीचा विरोध देशद्रोह नाही... मोदी भारत नाही..' अनुरागच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 



मोदी विरोधात ट्विट केल्यानंतर अनुराग कश्यपच्या फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. 5 लाख फॉलोअर्सची संख्या कमी होऊन 76.3 हजारांवर पोहोचली. याबाबतही अनुरागने ट्विट करून ट्विटर इंडियाला तक्रार केली आहे.  (CAA वरून बॉलिवूडमध्ये दोन तट)




अनुराग कश्यपने 16 डिसेंबर रोजी पुन्हा ट्विटरवर वापसी केली होती. याचवर्षी ऑगस्ट महिन्यात ट्विटरवरून अनुरागने निरोप घेतला होता. सध्या या दोन्ही ट्विटची जोरदार चर्चा आहे.