उत्सुकता शिगेला; `धर्मवीर 2` येतोय! दिग्दर्शक प्रविण तरडेंनी केली घोषणा
मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या (Marathi Movie) पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे (Anand Dighe) कळाले. कट्टर शिवसैनिक (Shiv Sainik) काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं, म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. आता या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच या सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या (Marathi Movie) पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे (Anand Dighe) कळाले. कट्टर शिवसैनिक (Shiv Sainik) काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं, म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. आता या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच या सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आज जेजुरीत धर्मवीर 2 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नुकतीच निर्माते मंगेश देसाई आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देवस्थान जेजुरी येथे या सिनेमाची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे प्रवीण तरडे यांनी गेले दोन महिने या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर मेहनत घेतली आहे. मे 2022 मध्ये प्रदर्शित झालेंल्या धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित या चित्रपटाची कथा होती
धर्मवीर 2 चित्रपटात कोणते धक्कादायक खुलासे - गौप्यस्फोट असणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागंलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचं दिसत आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे' चित्रपटात आनंद दिघे यांच्या राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता. त्यामुळे आता या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात आनंद दिघे यांच्या भूमिकेत अभिनेता प्रसाद ओक दिसला होता. त्याच्या अभिनयाचं सगळीकडून कौतूकही करण्यात आलं होतं. २०२४ मध्ये धर्मवीर चित्रपटाचा पुढील भाग प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या पुढील भागात राजकीय वर्तुळातले मोठे गौप्यस्फोट होऊ शकतात असं म्हटलं जातंय. त्यामुळे या सिनेमाची प्रेक्षक वाट पाहत आहेत.