'कल्कि 2898 एडी' पाहण्याचा करताय प्लॅन? मग पाहा नेटकरी काय म्हणताय...

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'कल्कि 2898 एडी' हा चित्रपट आज 27 जुन रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं बजेट हे 600 कोटी आणि त्यासोबत भलीमोठी स्टारकास्ट पाहायला मिळाली. यात दाक्षिणेतील आणखी दोन कलाकाराची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. चला तर आता जाणून घेऊया हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे. 

| Jun 27, 2024, 14:13 PM IST
1/7

'कल्कि 2898 एडी' मध्ये कधी अपयशी न होणाऱ्या भैरवाची एन्ट्री... नक्कीच हा चित्रपट पाहा.   

2/7

'कल्कि 2898 एडी' हा एक फ्लॉलेस चित्रपट असून कोणत्याही पद्धतीनं दुजाभाव न करता माझ्या नजरेत 10/10 ला रेटिंग्स मी देतोय. मी अजूनही त्यात चूका शोधण्याचा प्रयत्न करत आहे पण ते शोधण्यात मी अपयशी ठरलो. नाग अश्विन मी आता फॅन झालोय. दीपिकानं आईच्या भूमिकेत अतशिय अप्रतिम भूमिका साकारली आहे. 

3/7

'कल्कि 2898 एडी' हा राजामौलींच्या चित्रपटांप्रमाणे असलेला चित्रपट आहे. त्यातही शेवटचे 30 मिनिटं. कधीच भारतीय चित्रपटांमध्ये झालं नाही ते या चित्रपटात पाहायला मिळालं. नाग अश्विनची पटकथा आणि त्याला ज्या पद्धतीनं पडद्यावर दाखवलंय ते अप्रतिम.

4/7

'कल्कि 2898 एडी' चा फर्स्ट हाफ हा खूप चांगल्या प्रकारे मनोरंजन करताना दिसत आहे. एक वेगळं जग पाहायला मिळत आहे. पण चित्रपट तुमची उत्सुकता वाढवत नसला तरी देखील तुम्हाला कंटाळ येत नाही. कमल हासननं सुंदर 

5/7

'कल्कि 2898 एडी' मध्ये वेगवेगळे युग पाहायला मिळाले आहेत. ते पाहिल्यावर उत्साही असल्याचं जाणवतं. 

6/7

प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर विजय देवरकोंडा आणि दुलकर सलमानची पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत.  

7/7

आधी 9 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं आगाऊ बूकिंग हे मोठ्या प्रमाणात झालं होतं. तर या चित्रपटानं ओपनिंग डेला 14 लाख पेक्षा जास्त तिकिटं बूक झाली होती आणि अगाऊ बूकिंगमध्येच चित्रपटानं 38.41 कोटींची कमाई केली.