समुद्राचं पाणी गोड करण्यापासून स्वर्गाच्या शिडीपर्यंत रावणाच्या 'या' 7 इच्छा अपूर्णच!

देवतांना देखील हरवणारा रावण महापंडित आणि महाज्ञानी होता. पण रावणाची सर्वात मोठी चूक ही होती की, तो त्याच्या शक्ती आणि ज्ञानाच्या अहंकारात स्वतःला देव मानत होता आणि देवाने बनवलेले नियम बदलू इच्छित होता. रावण अजून काही वर्षे जगला असता तर त्याने सात अपूर्ण कामे पूर्ण केली असती आणि मग जग वेगळे झाले असते. 

| Jun 27, 2024, 12:55 PM IST

देवतांना देखील हरवणारा रावण महापंडित आणि महाज्ञानी होता. पण रावणाची सर्वात मोठी चूक ही होती की, तो त्याच्या शक्ती आणि ज्ञानाच्या अहंकारात स्वतःला देव मानत होता आणि देवाने बनवलेले नियम बदलू इच्छित होता. रावण अजून काही वर्षे जगला असता तर त्याने सात अपूर्ण कामे पूर्ण केली असती आणि मग जग वेगळे झाले असते. 

आज आपण रावणाची ती सात अपूर्ण कामे कोणती आहेत, हे जाणून घेणार आहोत. 

1/7

स्वर्गात शिडी

रावणाची पहिली इच्छा होती की, त्याला स्वर्गात शिडी तयार करायची होती.  रावणाची अशी इच्छा होती की, प्रत्येक व्यक्तीला स्वर्गात जाता यावं. यामुळे त्याने स्वर्गातील शिड्या तयार करण्याचं कामही सुरु केलं होतं. पण ही शिडी पूर्ण व्हायच्या आतच रावणाचा भगवान श्रीरामाकडून अंत झाला. 

2/7

समुद्राचं पाणी गोडं

रावणाचे दुसरे स्वप्न होते की, समुद्राचे पाणी गोड करणे. रावणाला माहित होतं की, पृथ्वीवर पिण्यासाठी पाणी कमी आहे. जर समुद्राचं पाणी गोड झालं तर पाण्याची समस्या पूर्णपणे संपून जाईल. हे कामही रावणाने हाती घेतलं होतं पण ते करण्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला.   

3/7

सोन्याला सुगंध

रावणाचे तिसरे काम अर्धवट राहिले ते म्हणजे सोन्याला सुगंध. रावणाला सोन्याची प्रचंड आवड होती. त्याला संपूर्ण शहर सोन्याचं बनवायचं होतं. रावणाची अशी इच्छा होती की, सोन्याला सुगंध यावा. यामुळे सोन्याचा शोध सोपा होईल, हा या मागचा रावणाचा विचार होता.   

4/7

दारू गंधहीन व्हावी

रावण आणखी काही दिवस जीवंत राहिला असता तर त्याने दारूला गंधहीन बनवल असतं. रावणाची ही चौथी इच्छा अपुरीच राहिली याला कारण म्हणजे प्रत्येकजण दारुचा आनंद घेईन. अनेकजणांना दारुचा वास आवडत नाही. त्यामुळे ते दारू पिणं टाळतात. 

5/7

रंगभेद संपवणे

लंकापती रावणाला रंगभेद संपवणार होतो. रावणाची अशी इच्छा होती की, सगळे लोकं गोरे असावेत. कुणीच कुणाची रंगावरुन थट्टा करु नये. रंगामुळे कुणाची खिल्ली उडवली जाऊ नये.   

6/7

पूजा करणे बंद करा

रावणाची अशी इच्छा होती की, संसार देवतेची पूजा करणे बंद करावी. पण रावणाचं हे स्वप्न अर्धवटच राहिलं.  

7/7

रक्ताचा रंग पांढरा

these 7 wishes of ravana remained incomplete

रावणाची शेवटची आणि सातवी अपुरी राहिलेली इच्छा म्हणजे रावणाला वाटायचे की, लाल रंगाचे रक्त हे पांढऱ्या रंगाचे व्हावा. कारण त्याने केलेल्या हत्येची माहिती कुणालाच कळू नये.