Shahrukh Khan Viral Video : कधी काळी बुटांची जाहीरात करायचा, आज बॉलीवूडवर करतो राज्य, जुन्या जाहीरातीचा Video व्हायरल
Shahrukh Khan Viral Video : पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सोशल मीडियावर Shahrukh Khan च्या जुन्या जाहीरातीचा Vidoe होतोय व्हायरल
Shahrukh Khan Old Advertisement Video: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आपल्या 'पठाण' (Pathaan) चित्रपटावरुन चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान बुकिंगने रेकॉर्डब्रेक (Record Break Advance Booking) केल आहे. तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर येणाऱ्या शाहरुख खानला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये जबर उत्सुकता आहे. यादरम्यान, शाहरुख खानच्या जुन्या जाहीरातीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री करण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळातला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत शाहरुखने निळ्या रंगाची जर्सी घातली असून एका बूटांची ही जाहीरात आहे. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा शाहरुख खान किंग खान बनला नव्हता.
जुना व्हिडिओ का होतोय व्हायरल
शाहरुख खानने आपल्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीला या जाहीरातीत काम केलं होतं. ही जाहीरात एका स्पोर्ट्स शूजची (Sports Shoes) आहे. या जाहीरातीत शाहरुखने निळ्या रंगाचं टी-शर्ट आणि निळया रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे. डोक्यालाही त्याने निळ्या रंगाचा बँड बाधला आहे. ही एका बुटांची जाहीरात आहे. शाहरुख खानची ही जाहीरात सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी कमेंट आणि लाईकचा पाऊस पाजला आगे. काही जणांना शाहरुख्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करुन दिली आहे.
4 वर्षांनी मोठ्या पडद्यावर
पठाण चित्रपटातून शाहरुख खान चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर येत आहे. पण प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्य भोवऱ्यात अडकला होता. आता येत्या 25 जानेवारीला पठाण प्रदर्शित होतोय. चित्रपटात शाहरुख खान याच्यासह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. चित्रपटाचं अॅडव्हान बुकींग फूल झालं आहे.
'बेशरम रंग' गाण्यावरुन वाद
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्याने वाद निर्माण झाला होता. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकीनीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत हिंदू महासभेने आणि अनेक राजकीय नेत्यांनी या चित्रपटाविरोधात आवाज उठवला. मात्र त्याचा उलट फायदा या चित्रपटांच्या गाण्यांना होताना दिसला. चित्रपटातील दोन्ही गाण्यांना कोट्यवधी व्हिव्यू मिळाले आहेत.