मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझैन खान (Sussanne Khan) आजकाल अर्सलन गोनीसोबतच्या (Arslan Goni) तिच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहे. सुझैन आणि अर्सलन अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. दोन मुलांची आई असलेली सुझैन खान हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan)मॉडर्न पॅरेंटिंगद्वारे मुलांचे संगोपन करत आहे. काल सगळे लोक रक्षाबंधन साजरा करत असताना, हे लव्हबर्ड्स फिरायला एकत्र गेले होते, त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 


आणखी वाचा : 'हर हर शंभू' फेम फरमानी नाझचं गाणं Youtube वरून हटवण्याच कारण समोर, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुझैन आणि अर्सलनचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. हा व्हिडीओ बॉलीवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर अर्जुन कानूनगो याच्या रिसेप्शन पार्टीतला आहे. लग्नानंतर अर्जुननं ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. याच पार्टीतला सुझान आणि अर्सलानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अर्जुनच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत सुझैन बोल्ड अंदाजात दिसली. 


आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 


आणखी वाचा : ल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; पाहा ठरतोय चर्चेचा विषय


नुकत्याच सुरु असेलल्या चर्चांनुसार, हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझैन लवकरच तिचा बॉयफ्रेंड अर्सलन गोनीसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'सुझैन आणि अर्सलन Mature आहेत आणि त्यांना माहित आहे की त्यांना त्यांचे उर्वरित आयुष्य एकत्र घालवायचे असून त्यांना लग्न करायचे आहे. सुझैननेही दुसऱ्यांदा लग्न करण्याचा गंभीरपणे विचार केला आहे. जर दोघांनीही लग्न केले तर मग ते अगदी साध्या पद्धतीने होईल. कोणताही मोठ्या प्रकारे सेलेब्रेशन होणार नाही.'


आणखी वाचा : मुलांचे फोटो काढणाऱ्यांना पाहून सूर्याचा संताप अनावर, रागाच्या भरात त्यानं काय केलं, Video Viral


2000 मध्ये हृतिक आणि सुझैनचे लग्न झाले. या दोघांची जोडी ही चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. 2013 मध्ये हृतिक आणि सुझैनचा घटस्फोट झाला. मात्र, विभक्त होऊनही दोघांनी रेहान आणि रिदान या मुलांना एकत्र वाढवले.