मुलांचे फोटो काढणाऱ्यांना पाहून सूर्याचा संताप अनावर, रागाच्या भरात त्यानं काय केलं, Video Viral

सूर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Updated: Aug 12, 2022, 10:28 AM IST
मुलांचे फोटो काढणाऱ्यांना पाहून सूर्याचा संताप अनावर, रागाच्या भरात त्यानं काय केलं, Video Viral title=

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता सूर्या (Suriya) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सूर्या नुकताच मुंबईत दिसला. येथे तो पत्नी ज्योतिका आणि मुलांसोबत दिसला (Suriya Spotted with Wife Jyotika and Children)सूर्याचा कुटुंबासोबत फिरतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सूर्यानं पत्नी ज्योतिकासोबत क्लिक केलेले फोटो पाहायला मिळतात. मात्र जेव्हा पापाराझी सूर्याच्या मुलांचे फोटो काढण्यासाठी पुढे येतात तेव्हा तो त्यांना मागे व्हायल सांगतो. 

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

सुर्या पत्नी ज्योतिकाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुंबईत आला होता. खरंतर ही काही दिवसांपूर्वीची घटना आहे. या व्हिडीओत सूर्या आणि ज्योतिकासोबत असल्याचे दिसते. सूर्या आणि ज्योतिका पापाराझींसमोर पोजही देतात हे सगळं त्यांनी पार्क केलेल्या जागी सुरु असतं. 

आणखी वाचा : ल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; पाहा ठरतोय चर्चेचा विषय

सूर्या आणि ज्योतिका गाडीकडे जात असताना सूर्यानं त्याच्या दोन्ही मुलांना हाक मारली. ते दोघेही लगेच धावत गाडीजवल येतात. हे पाहताच पापाराझी त्यांचे फोटो काढू लागतात. हे पाहून सूर्याला राग येतो आणि तो पॅप्सला बोलतो,  मुलांना तरी सोडा. त्याचा फोटो काढू नका. त्यानंतर पॅप्स त्यांचा कॅमेराही बंद करतात. आता यासाठी सोशल मीडियावर लोक अभिनेत्याचे जोरदार कौतुक करत आहेत.

आणखी वाचा : 90 वर्षांची परंपरा जपण्यासाठी इथं गावकरी कपडेच घालत नाहीत

सूर्या सगळ्यात शेवटी अभिनेता कमल हासन यांच्या 'विक्रम' चित्रपटात पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला. या चित्रपटात सूर्यानं रोलेक्स ही भूमिका केली होती. याशिवाय सूर्या आर माधवनच्या रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या चित्रपटातही पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. आता तो निर्माता म्हणून बॉलिवूड चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे. त्यांची 2D मनोरंजन निर्मिती कंपनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'सूरराई पोत्रू' चित्रपटाचा बॉलीवूड रिमेक बनवत आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर दिसणार आहेत.