देशातील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री; 10 हजार साड्या, 800 किलो चांदी आणि 28 किलो सोनं; भल्याभल्यांना नमवणारी ती होती तरी कोण?
India`s Richest Actress Had 28 kg Gold and 800 kg Silver : देशातील या अभिनेत्रीकडे होत्या सगळ्यात महागड्या साड्या आणि किलोंमध्ये होतं सोनं आणि चांदी...
India's Richest Actress Had 28 kg Gold and 800 kg Silver : काही दिवस आधी आलेल्या एका रिपोर्टनुसार, आपल्या देशातील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री कोणी आहे तर ती जुही चावला आहे. जुही चावलाची एकूण नेटवर्थ ही 4600 कोटी आहे. जुहीनं भारतातील सगळ्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. आतापर्यंत कोणतीही भारतीय अभिनेत्री नाही जिची नेटवर्थ ही एक हजार कोटींच्या जवळपास आहे. पण तुम्हाला माहितीये का की एक अभिनेत्री अशी होती जी सगळ्यात श्रीमंत होती आणि तिच्या इतकं श्रीमंत आजपर्यंत कोणी नव्हतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जुही चावलानं त्या अभिनेत्रीची जागा घेतली आहे. पण तसं नाही आजही जुही चावली ही त्या अभिनेत्रीची जागा घेऊ शकत नाही. जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री...
ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून तमिळ आणि तेलगू चित्रपटांमधील दिवंगत अभिनेत्री जयललिता आहे. जयललिता यांनी अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्या तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील टॉपच्या अभिनेत्री होत्या. त्यांनी बॉलिवूडमध्ये देखील काम केलं होतं. जयललिता यांनी वयाच्या 15 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर जयललिलात या एमजीआरला स्वत: च्या गुरु मानायच्या. एमजीआरसोबत जयललिता यांनी जवळपास 28 वर्ष काम केलं.
जयललिता या त्यांच्या काळातील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री होत्या. पण त्यांची सगळ्यात जास्त कमाई ही राजकारणात आल्यानंतर झाली होती. त्यांच्याकडे महागड्या साड्या आणि चप्पलचं कलेक्शन होतं. 1997 मध्ये चेन्नईमध्ये जयललिता यांच्या घरी जेव्हा CBI नं धाड टाकली होती तेव्हा त्यांच्या घरी 10 हजार 500 साड्या, 750 चप्पल, 800 किलो चांदी आणि 28 किलो सोन सापडलं होतं. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आरोप केले होते की जयललिता यांनी 188 कोटींची संपत्ती दाखवली होती. पण खरंमध्ये त्यांची संपत्ती ही 900 कोटींची होती. जर आज त्यांच्या संपत्तीचा विचार केला तर ती एकूण 5 हजार कोटींची आहे. ही संपत्ती जुही चावलाच्या एकूण संपत्ती पेक्षा जास्त आहे.
हेही वाचा : 'माझ्याकडे पुढची फक्त 10 वर्ष...', आमिर खानचं मोठं वक्तव्य
जयललिता या त्यांच्या काळातील टॉपच्या अभिनेत्री होत्या. अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जयललिता यांनी यातून काढता पाय घेतला होता. त्यांच्या आयुष्यावर आधारित सात चित्रपटांची घोषणा करण्यात आली होती. काही राजकारण्यांच्या दबावामुळे प्रदर्शित होऊ शकले नाही. दरम्यान, काही चित्रपट ही प्रदर्शित झाले. मणिरत्नम यांचा 'इरुवर' हा चित्रपट देखील जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत होता. यात ऐश्वर्या रायनं त्यांची भूमिका साकारली होती. दरम्यान, हाच ऐश्वर्याचा पहिला चित्रपट होता.