मुंबई : बॉलिवूड दिवंगत अभिनेते इरफान खान यांची  (Irrfan Khan)पत्नी सुतापा सिकदर (Sutapa Sikdar) यांनी सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 14 जून रोजी वयाच्या 34व्या वर्षी सुशांतने आत्महत्या करुन सर्वांनाच मोठा धक्का दिला. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. काही लोक सुशांतच्या निधनानंतर ही हत्या असल्याचं म्हणत बॉलिवूडवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यादरम्यान सुतापा सिकदर यांनी फेसबुकवर कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकवर सुतापा सिकदर यांनी, 'सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सहानुभूती व्यक्त केली जात नसून, आपण मृत आणि जीवित यांच्याप्रति सन्मान करणंच विसरलो आहे.' अशी प्रतिक्रिया व्यक्त करत कडक शब्दांत फटकारलं आहे. सुतापा यांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.



'त्या' लोकांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; सुशांतच्या आत्महत्येनंतर मनसेचा इशारा



राखीच्या स्वप्नात येऊन सुशांत म्हणतो, तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेईन मी!


 


सुशांतचं जाणं, बॉलिवूडसाठी मोठं नुकसान आहे, कारण असा अभिनेता पुन्हा येणार नाही. तो कविता करायचा, मुलांना नासामध्ये पाठवण्याचं त्याचं स्वप्न होतं, तो दान, योग करायचा, खगोलशास्त्रात त्याला रुची होती तो एक विशेष मुलगा, विशेष व्यक्ती होता. मला अतिशय दु:ख आहे की, तो इतक्या वेदनेतून जात होता. माझ्या मनात तुझ्याविषयी कायम एक विशेष स्थान राहिल सुशांत...अशा आशयाची पोस्ट करत सुतापा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.