राखीच्या स्वप्नात येऊन सुशांत म्हणतो, तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेईन मी!

खुद्द राखीनंच याबाबतचा खुलासा केला  

Updated: Jun 22, 2020, 09:26 AM IST
राखीच्या स्वप्नात येऊन सुशांत म्हणतो, तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेईन मी!
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं काही दिवसांपूर्वी त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतनं हे टोकाचं पाऊल उचलल्यानंतर कलाविश्वाला हादराच बसला. सध्याच्या घडीला त्याच्या आत्महत्येच्या मुळ कारणाशी पोहोचण्यासाठीचा तपास सुरु असून, सुशांतच्या संपर्कात असणाऱ्या काही मंडळींची चौकशी सुरु आहे. 

चौकशीच्या याच सत्रांमध्ये आता वादग्रस्त विधानं करण्यासाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंत हिनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सुशांतच्या बाबतीत राखी असं काही बोलून गेली आहे, की तिच्या या वक्तव्यानं अनेकांनाच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्थात राखीचं वक्तव्य सोशल मीडियावर फक्त चर्चांची सत्र रंगवत आहे, हेसुद्धा तितकंच खरं. 

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत राखीनं चक्क सुशांत आपल्या पोटी पुन्हा जन्म घेणार असल्याचं सांगितलं. मी रात्री झोपले होते, तेव्हाच अचानक आवाज झाला. कोण आहे असं विचारल्यास आवाज आला, मी सुशांत सिंह राजपूत, असं म्हणत राखीनं हा व्हिडिओ पोस्ट केला. 

'कलाविश्वानं मला सतावलं'

सुशांतनं स्वप्नात येत आपल्याला या कलाविश्वानं फार त्रास दिल्याचं म्हणज वेगळं काढल्याचंही तो म्हणाला, असं राखीनं सांगितलं. 'मी या साऱ्यांचाच सूड घेईन. शरीर अस्तित्वात नसलं तरीही माझा आत्मा अद्यापही अस्तित्वात आहे. त्यामुळं मी कोणालाही सोडणार नाही', असं सुशांतनं स्वप्नात सांगल्याचं राखी या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसते.

 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 
 
 
 

 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 

राखीनं पोस्ट केलेला हा व्हिडिओ आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता काही नेटकऱ्यांनी या प्रकरणी नारीजीही व्यक्त केली आहे. तर, काहींनी राखीला धारेवर धरत तिला खडे बोलही सुनावले आहेत. पण, या साऱ्यामध्ये राखीनं पोस्ट केलेला व्हिडिओ मात्र भलताच व्हायरल होत आहे हे नाकारता येणार नाही.