'त्या' लोकांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; सुशांतच्या आत्महत्येनंतर मनसेचा इशारा

मनसेचा इशारा 

Updated: Jun 20, 2020, 08:27 AM IST
'त्या' लोकांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; सुशांतच्या आत्महत्येनंतर मनसेचा इशारा title=

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी १४ जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. तपासा दरम्यान समोर आलं की, नैराश्यातून सुशांतने मृत्यूला कवटाळलं. पण सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर सिनेजगतात मोठी खळबळ उडाली आहे. नेपोटिझमच्या मुद्द्याने डोकं वर काढलं आहे. या सगळ्या प्रकरणावर मनसेने आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना इशारा दिला आहे. 

सुशांतचा बळी जाण्याचं काही कारण नव्हतं, मात्र जर सुशांत सिंह राजपूतला आपल्याला डावळलं जात असल्याची भीती होती. तसेच कंगना रानावतने केलेले आरोप खरी असतील तर मनसेच्या वतीने आत्महत्येस प्रवृत्त करण्यांना 'मनसे दणके' देण्यात येईल असा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिली आहे. 

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. यासंदर्भात काहींची चौकशी देखील होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेने देखील आपली भूमिका व्यक्त केली आहे.

ठाण्यात एका वेगळ्या विषयावर मनसेचे नेते अभिजीत पानसे आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती . त्यावेळी पानसे यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या गोष्टींवर आपले मत व्यक्त केले.

दरम्यान, सुशांतची आत्महत्या म्हणजे हा सर्व प्रकार क्लेशदायक आहे. खऱ्या कलाकाराचं प्रेम हे पैसे आणि इतर गोष्टींपेक्षा कलेवर जास्त असतं. जर त्याला ते करु दिलं नाही, तर त्याचा स्फोट होतोच. एखाद्याचा बदला म्हणून त्याला इंडस्ट्रीच्या बाहेर काढणे हा गुन्हा आहे, असं अभिजीत पानसे म्हणाले आहेत.