Is Athiya Shetty Pregnant : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि पती केएल राहुल यांच्या लग्नाला एक वर्ष झालं आहे. गेल्या वर्षी 23 जानेवारी 2023 रोजी अथिया आणि केअल राहुलनं सप्तपदी घेतल्या. त्या दोघांच्या लग्नाला एक वर्ष झालं आहे. तर आता असं म्हटलं जात आहे की ते आई-वडील होणार आहेत. या गोष्टीची हिंट कोणत्याही रिपोर्टमध्ये देण्यात आली नाही तर सुनील शेट्टीनं दिली आहे. चला जाणून घेऊया नक्की काय झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील शेट्टीनं 'डान्स दीवाने' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये सुनील शेट्टी हा माधुरी दीक्षितसोबत परिक्षण म्हणून काम करत होता. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये दादा-दादी म्हणजेच आजी-आजोबा असा एक स्पेशल एपिसोड होता. ज्याचे सुत्रसंचालन भारती सिंहनं केलं. या एपिसोड दरम्यान, भारतीनं सुनीलला विचारलं की जेव्हा तो आजोबा होईल तेव्हा त्याला कसं वागावलं लागेल, कारण कोणतेही मुलं इतके गुडलूकिंग आजी-आजोबांना सांभाळू शकत नाही. ज्यावर सुनीलनं म्हटलं की, हो, पुढच्या सीझनमध्ये जेव्हा मी येईल तेव्हा आजोबा होऊन येईल.  



यावेळी सुनील शेट्टीनं केलेल्या या वक्तव्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आणि सगळे विचार करु लागले की त्याची लेक अथिया शेट्टी ही प्रेग्नंट आहे की काय? दरम्यान, अथिया आणि केएल राहुल हे दोघेही त्यांचं आयुष्य खूप प्रायव्हेट ठेवतात. त्यामुळे त्यांनी ही गोड बातमी देखील सगळ्यांपासून लपवून ठेवली असेल असं म्हणता येईल. त्याशिवाय अथिया काही काळापासून चित्रपटांपासून लांब आहे आमि कोणत्याही कार्यक्रमात जास्त दिसत नाही. त्यामुळे अथिया प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 


हेही वाचा : गर्ल्स पॉवर! Crew ने रचला अनोखा विक्रम; करीना, तब्बू, क्रितीच्या चित्रपटाने कमवला इतका गल्ला


दरम्यान, अथियाच्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर तिनं अनामिका खन्नानं डिझाइन केलेला गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर तिचा हा लेहेंगा चिकनतकारी होता. तर केएल राहुलनं अनामिका खन्नानं डिझाइन केलेली शेरवानी परिधान केली होती. त्या दोघांच्या लूकची सगळीकडे चांगलीच चर्चा झाली होती. तर त्या दोघांनी सुनील शेट्टीच्या लोनावळ्यातील फार्महाऊसवर लग्न केलं.