गर्ल्स पॉवर! Crew ने रचला अनोखा विक्रम; करीना, तब्बू, क्रितीच्या चित्रपटाने कमवला इतका गल्ला

Crew Box Office Collection Day 2 : करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेननच्या क्रू या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

दिक्षा पाटील | Updated: Mar 31, 2024, 10:52 AM IST
गर्ल्स पॉवर! Crew ने रचला अनोखा विक्रम; करीना, तब्बू, क्रितीच्या चित्रपटाने कमवला इतका गल्ला title=
(Photo Credit : Social Media)

Crew Box Office Collection Day 2 : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, क्रिती सेनन आणि तब्बूचा क्रू हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. खरंतर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून प्रेक्षकांना त्या चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत होते. त्यात चित्रपट प्रदर्शित होताच सगळ्यांना आनंद झाला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन केलं होतं. त्यानंतर विकेंडला देखील या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. फर्स्ट विकेंडला म्हणजेच शनिवारी या चित्रपटानं किती कमाई केली हे जाणून घेऊया. 

तब्बू, क्रिती सेनन आणि करीना कपूर यांच्या या चित्रपटाला ‘क्रू’ ला क्रिटिक्सकडून देखील चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत. इतकंच नाही तर प्रेक्षकांकडून देखील या चित्रपटाला चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. त्या तिघांच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक सुरु आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 9.25 कोटींची कमाई केली. तर सैकनिल्कनं दिलेल्या रिपोर्टनुसार, दुसऱ्या दिवशी करीना, क्रिती आणि तब्बूच्या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसमध्ये 9.6 कोटींची कमाई केली. खरंतर हा कोणताही ऑफिशियल डेटा नाही आहे. याचा अर्थ या चित्रपटानं भारतात एकूण 18.85 कोटींची कमाई केली आहे. हा फक्त अंदाज लावण्यात आलेला एक आकडा आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी संपूर्ण माहिती समोर आल्यानंतर सत्य काय ते कळेल. या चित्रपटाला गुगलवर 5 पैकी 4.3 रेटिंग्स आहेत. IMDb वर या चित्रपटाला 8.4 रेटिंग मिळाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, करीनानं काल एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती की पहिल्याच दिवशी या चित्रपटानं वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 20.7 कोटींची कमाई केली. या चित्रपटाच्या कास्टिंग विषयी बोलायचे झाले तर यात पंजाबी गायक आणि सिंगर दिलजीत दोसांझ, कपिल शर्मानं महत्त्वाची भूमिका सांगितली आहे. तर राजेश शर्मा, सास्वत चॅटर्जी सहायक भूमिकेत दिसणार आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केलं आहे. तर एकता कपूर, रिया कपूर, अनिल कपूर आणि दिग्विजय पुरोहित यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.