क्रिती सेनन करतेय कार्तिक आर्यनला डेट? अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
अभिनेत्री क्रिती सेनन हिने सहकलाकार कार्तिक आर्यनसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबई : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान मिळवणारी अभिनेत्री क्रिती सेनन हिने सहकलाकार कार्तिक आर्यनसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली आहे आणि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे. मात्र, व्हिडिओ समोर आल्यापासून क्रिती सॅनन चर्चेत आहे.
क्रिती सेनन 'भूल भुलैया 2' चा अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करत असल्याची चर्चा सगळीकडे होत आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने नुकतंच एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर मौन सोडलं आहे.
अलीकडेच एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत क्रिती सॅननने या अफवा असल्याचं सांगितलं आहे. यावेळी अभिनेत्री म्हणाली की, 'लोकं नेहमी अशा निकालानंतर अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.' पुढे बोलताना अभिनेत्री म्हणाली की, सोशल मीडिया ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की वाईट हे तिला अजूनही माहित नाही. याबद्दल क्रिती सॅननची नेहमीच संमिश्र भावना असते.
अभिनेत्रीने असंही सांगितलं की, मी अशा अफवांना कधीही घाबरत नाही. या अफवांनंतर, क्रिती सॅननला वाटतं की, माझं जीवन लोकांना वाटतं तितकंच मनोरंजक असंल असतं तर? कामाच्या आघाडीवर, क्रिती सॅननचे आगामी काळात अनेक प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत. ही अभिनेत्री लवकरच टायगर श्रॉफच्या 'गणपत : पार्ट वन' आणि वरुण धवनसोबत 'भेडिया'मध्ये दिसणार आहे.