सुकेश चंद्रशेखरनं Jacqueline Fernandez ला..., जॅकलिनच्या स्टायलिशचा धक्कादायक खुलासा
जॅकलिनच्या स्टायलिशनं चौकशीत हा धक्कादायक खुलासा केला आहे.
मुंबई : कॉनमन सुकेश चंद्रशेखर विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात सुरू असलेल्या तपासादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीज ( Jacqueline Fernandez ) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांची नावं पुढे आली आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) आर्थिक गुन्हे शाखेनं तपास सुरु केला. या वेळी आर्थिक गुन्हे शाखेनं (Economic Offences Wing) जॅकलिनची चौकशी केल्यानंतर, तिच्या स्टायलिस्टलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं. लीपाक्षी एलावाडी (Leepakshi Ellawadi) नं यापूर्वी अभिनेत्रीला स्टाइल केलं आहे. तिला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं कारण तिनं या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर या जॅकलीन यांच्या नात्याविषयी जाणून घ्यायचे होते.
आणखी वाचा : 2000 सिम कार्ड्सच्या ड्रेसमुळे Urfi Javed च्या घरी पोहोचले पोलीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
लिपाक्षी इलावाडीनं तिच्या वक्तव्यात जॅकलिन आणि सुकेश चंद्रशेखर यांच्याविषयी अनेक खुलासे केले आहेत. एका अधिकाऱ्यानं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 'जॅकलिन कोणत्या ब्रँड्स आणि कपड्यांना पसंती देते हे जाणून घेण्यासाठी त्यानं गेल्या वर्षी लिपाक्षीशी संपर्क साधला होता. त्यानं तिच्याकडून सगळी माहिती जाणून घेतली आणि तिला 3 कोटी रुपयेही दिले. चंद्रशेखरनं दिलेली संपूर्ण रक्कम लिपाक्षीनं जॅकलिनसाठी भेट वस्तू घेण्यात खर्च केली. लिपक्षीनं असेही सांगितलं की सुकेशच्या अटकेच्या वृत्तानंतर, जॅकलीननं त्याच्याशी सगळे संबंध तोडले.
आणखी वाचा : मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणं योग्य की अयोग्य?
गेल्या महिन्यात जेव्हा अंमलबजावणी संचालनालयानं (Enforcement Directorate) या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं, तेव्हा त्यांनी जॅकलिनला आरोपी बनवलं. तिच्या बचावात, जॅकलिननं पीएमएलए (PMLA) अपील प्राधिकरणासमोर याचिका दाखल केली होती ज्यामध्ये तिने म्हटले होते, 'दुर्दैवानं, ईडीचा दृष्टिकोन अत्यंत यांत्रिक आणि प्रेरित असल्याचं दिसून येतं. भेटवस्तू मिळालेल्या इतर सेलिब्रिटींना साक्षीदार करण्यात आलं, तर जॅकलिनचा आरोपी म्हणून उल्लेख केला होता. हे स्पष्टपणे तपास प्राधिकरणाकडून दुर्भावनापूर्ण, प्रेरित आणि पक्षपाती दृष्टीकोन दर्शवते ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.' (jacqueline fernandezs stylist leepakshi ellawadi admits to receive 3 crore rupees from sukesh chandrasekhar)
आणखी वाचा : 'हा मुलगा मोठा होऊन....', Sonam Kapoor च्या मुलाविषयी मोठी भविष्यवाणी आली समोर
खंडणी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. त्याच्यावर अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यात फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांच्या पत्नी आदिती सिंग यांचाही समावेश आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नं 17 ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात सुकेश चंद्रशेखरच्या कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनचं आरोपी म्हणून नाव दिलं. ईडीच्या म्हणण्यानुसार जॅकलिन आणि नोरा यांनी चंद्रशेखरकडून महागड्या गाड्या आणि इतर अनेक भेटवस्तू घेतल्या होत्या.